गेले काही दिवस हवेतील उष्णता अधिकच वाढली आहे. आज उष्णतेने कहरच गाठला. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने उष्णतेचे तापमान अधिकच वाढले. हवेतील उष्णता अधिक तीव्र बनत आहे. गेले काही दिवस उष्णता वाढत असल्याने जनता हैराण बनली आहे. निसर्गाने हिरवाईचे आच्छादन देऊनही उष्णतेचे चटके सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात जाणवत आहेत. त्यामुळे लोक हैराण बनले आहेत. उष्णतेच्या तीव्रतेमुळे लोकांना घरात राहणे व झोपणेही त्रस्त करून सोडणारे बनले आहे. फॅनची हवासुद्धा अंगातून उष्णता बाहेर काढणारी ठरली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या भागात मंगळवारी मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे बुधवारी दिवसभर रणरणत्या उन्हाळ्याने लोकांना त्रस्त करून सोडले. तळपता सूर्य आगच ओकत असल्याचे जाणवत होते. या उष्णतेच्या बसणाऱ्या चटक्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडण्यास नकार देत संध्याकाळी फेरफटका मारणे पसंत केले. आज महाराष्ट्रदिनी काही कार्यक्रमांना लोक संध्याकाळीच बाहेर पडले. उष्णतेचे चटके आज दिवसभर बसत होते. त्यामुळे लोकांना हवामानबदलाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा