पती पत्नीमधील कौटुंबिक वादातून नवऱ्याने स्वतःसह तीन मुलांवर पेट्रोल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास केला. मात्र जागरूक नागरिकामुळे जाळून घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. दरम्यान सावंतवाडी पोलिसांनी नवऱ्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची उद्या गुरुवार दि.२२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याचे नाव हुसेन रझाक गडीयाली (३७, वर्ष रा. कोकणनगर कोलगाव मुळ जामनगर गुजरात) असे आहे. न्यायालयात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड वेदिका राऊळ, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी बाजू मांडली.

हा प्रकार मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स मधील कापड दुकानात घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेला हुसेन गडीयाली याचे बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स येथे कपड्याचे दुकान आहे. पती व पत्नी यांचे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दररोजप्रमाणे गडीयाली याने आपले दुकान उघडले. त्यावेळी त्याची पत्नी आपल्या तिन्ही मुलांना घेऊन दुकानात आली. रात्री हुसेन गडीयाली हे दुकान बंद करण्यासाठी दुकानाचे शटर बंद करीत असताना पत्नी हिने आपण घरी जाणार नाही. मी दुकानातच राहणार आहे. असे सांगत राहिली. या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. तू दुकानातून घरी जा, तू घरी गेली नाहीस तर तुला व मुलांना मारून टाकीन व स्वतःला संपवून घेईन अशी धमकी त्याने दिली.

Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Satara, Abuse of minor girl, Abuse by father,
सातारा : वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : “आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”

हेही वाचा – माझी लाडकी बहीण योजना कोणी माईचा लाल आला तरीही बंद पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या प्रकाराने कॉम्प्लेक्समधील दुकानदारांसह नागरिकांनी गर्दी केली. यावेळी हुसेन गडीयाली याने रागाच्या भरात पेट्रोल पंपावर जाऊन बाटलीतून आणलेले पेट्रोल आपल्यासह तिन्ही मुलांच्या अंगावर ओतले. त्यात एका चार वर्षांच्या मुलाच्या नाक व तोंडात पेट्रोल गेले. या तिन्ही मुलांचे वय सुमारे चार, सात, व दहा वर्षे आहे. या घटनेची माहिती जागरूक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हुसेन गडीयाली याला ताब्यात घेतले. त्यानंतर घाबरलेल्या चार वर्षांच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तात्काळ डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मुलाच्या तब्येतीत सुधारणा झाली. याप्रकरणी पत्नी मुमताज हुसेन गडीयाली (वय २७) रा – माठेवाडा सावंतवाडी, यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन मुलांसह स्वतः अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी पती हुसेन गडीयाली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती सावंतवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा – सातारा : वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावरून वाद उफाळून आला आहे असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. मात्र वडिलाने आपल्यासोबत तिन्ही मुलांना पेट्रोल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.