सावंतवाडी : कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील असलेल्या आर.बी. बेकरीला आज शुक्रवार दि. १ नोव्हेंबर रोजी भल्या पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत आर. बी. बेकरी जळून पूर्णतः बेचिराख झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या बेकरी लगत बाजूला असलेल्या राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडीकल व अन्य दुकानांना देखील आगीचा फटका बसला आहे. नगरपंचायतच्या अग्निशामक बंबाद्वारे आगीवर नियंत्रण आणण्यात आले.

हेही वाचा – Fuel Price In Maharashtra: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा फटका; जाणून घ्या किती रुपयांनी वाढला तुमच्या शहरांतील इंधनाचा दर

हेही वाचा – Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”

या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली. आगीचा भडका उडाला, त्यामुळे आगीत चौकातील इतर दुकानाना फटका बसला आहे. कणकवली नगरपंचायतचा बंब आल्यानंतर आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर कुडाळ एमआयडीसी व मालवण नगरपंचायतचा बंब बोलावण्यात आला. त्यानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली. आज लक्ष्मीपूजन दिवाळीच्या काळात झालेल्या या दुर्घटनेमुळे काही दुकानचालकांना फटका बसला आहे.