तारकर्ली येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर वेगवेगळय़ा रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेनंतर पर्यटकांना तारकर्ली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र आकाश भास्करराव देशमुख (३०, रा. शास्त्रीनगर, अकोला) आणि डॉ. स्वप्निल मारुती पिसे (४१, आळेफाटा, पुणे) या दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच दुर्घटनेवरुन आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर आणि खास करुन राज्याच्या पर्यटनमंत्र्यांवर म्हणजेच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधताना या दोन पर्यटकांचा जीव वाचू शकला असता असं म्हटलंय.
नक्की पाहा >> Photos: श्वासांसाठी धडपड, आरडाओरड अन् धावपळ…; तारकर्ली बोट दुर्घटनेनंतरचे धक्कादायक फोटो
तारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत
तारकर्ली येथील ‘जय गजानन’ बोट किनाऱ्यावर येत असताना बुडाल्याने मंगळवारी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-05-2022 at 07:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhudurg malvan tourist boat sink nilesh rane slams health system scsg