सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ असलेला उडता सोनसर्प आढळून आला आहे. या गावात पुन्हा एकदा सोनसर्प आढळून आल्याने परिपूर्ण जैवविविधतेने हा भूभाग व्यापला आहे असे पर्यावरण प्रेमींनी म्हटले आहे. घोटगेवाडी येथील शेतकरी सखाराम नारायण सुतार यांच्या घरालगत शुक्रवारी सायंकाळी हा साप दिसून आला. नेहमी आढळणाऱ्या प्रजातीं व्यतिरिक्त नवीन प्रजातीचा साप असल्याचे उघडकीस आले. या सापाला सर्पमित्र लाडू गवस यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. अशा प्रकारचा साप गतवर्षी जूनमध्ये तेथील दत्त मंदिराच्या परिसरातील पिंपळाच्या झाडाखाली आढळून आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…

या सापाला शेलाटी तथा उडता सोनसर्प तथा इंग्रजीत ऑरनेट फ्लाईंग स्नेक (शास्त्रीय नाव – क्रिसोपेलिया ओर्नाटा) म्हणतात. हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा साप आहे. सहसा झाडांतून राहणारा हा सर्प फांद्यांतून लांब उड्डाणावजा उड्या मारू शकतो. माणसाला हानिकारक होईल इतका विषारी समजला जात नाही. हिरवट पिवळा ज्यावर काळे पट्टे आणि सुंदर नक्षी असलेला हा साप महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर आणि आंबोली घाटात काही प्रमाणात आढळून येतो. या सापाची लांबी ही सुमारे २.५ ते ४ फूट असून तो निमविषारी प्रवर्गातील असल्याचे जाणकारांचे मत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhudurg rare ornate flying snake found in sahyadri ghotgewadi in sawantwadi css