मालवण राजकोट किल्ला येथील शिव पुतळा दुर्घटनेतील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे व तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज मालवण येथील न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – NCP Ajit Pawar Proup : “एकाच महिलेला किती पदे देणार?”, अजित पवार गटात वादाची ठिणगी? रुपाली पाटील-ठोंबरे विरुद्ध चाकणकर वाद चव्हाट्यावर

हेही वाचा – Rahul Gandhi on Chhatrapati Shivaji Statue: पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान मोदींनी माफी का मागितली? राहुल गांधींनी सांगितली तीन कारणे…

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तांत्रिक सल्लागार डॉ. पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर जयदीप आपटे हा पसार होता. त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आउट नोटीसही जारी केली होती. यात काल रात्री मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला कल्याण येथून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आज सकाळी त्याला मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या दोन्ही संशयित आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhudurg two persons remanded in police custody till september 10 in connection with shivaji maharaj statue accident ssb