सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. दिवसभर उष्णता, रात्री हलकीशी थंडी जाणवत असतांनाच सकाळी दाट धुके पसरलेले होते. दरम्यान सायंकाळी दोडामार्ग तालुक्यातील काही भागात बिगर मौसमी पावसाचा शिडकावा झाला.

गेल्या तीन चार दिवसांपासून बदल होऊन उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आकाशात मध्येच ढगाळ वातावरण बघायला मिळत होते असे असताना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडला. दोडामार्ग तालुक्यातील घोटगे गावात फक्त पाच ते सात मिनिटे झालेल्या या वादळामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. घोटगे गावात पाच मिनिटांत साठ ते सत्तर शेतकरी यांच्या पन्नास हजार आसपास केळी झाडे पत्याप्रमाणे भुईसपाट झाली. अनेक घरांवर झाडाच्या फांद्या मोडून पडल्या वीज वाहिन्यांवर झाडे पडून वीज पुरवठा खंडीत झाला. जवळपास पन्नास लाखांहून जास्त नुकसान झाले आहे.

Story img Loader