प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी आज शिर्डी देवस्थानला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी बदललेल्या शिर्डीबाबत कौतुक केले. शिर्डीत आता खूप सुविधा झाल्या आहेत. दर्शन घेण्यासाठी सुलभता आली आहे. मंदिर प्रशासनही भाविकांना सर्वतोपरी मदत करत असते, असे त्यांनी म्हटले. यावेळी पत्रकारांकडून राज्यातील विद्यमान परिस्थितीबाबत त्यांचे मत जाणून घेतले. सुरेश वाडकर म्हणाले की, मी गाणं वाजवणारा माणूस आहे. मला राजकारणातलं काही कळत नाही. पण साईबाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सर्वकाही चांगलं करणार. मला वाटतं देवी-देवतांनीच पंतप्रधान मोदींची नेमणूक केली आहे.

‘काँग्रेस काळात रखडलेल्या प्रकल्पांना आम्ही पूर्ण केलं’, पंतप्रधान मोदींची टीका; कृष्णा-कोयनाचा केला उल्लेख

काय म्हणाले सुरेश वाडकर?

“मी गेली अनेक वर्ष शिर्डीत येत आहे. साईबाबांकडे मी कधीच काही मागितले नाही. इथे मातीची वाट होती तेव्हापासून मी शिर्डीत येत आहे. साईबाबांकडून प्रत्येकाची मागणी पूर्ण होत असते. म्हणूनच भाविकांचे लोट येत असतात. नाशिकमध्ये मी वरचेवर येत असतो. तेव्हा प्रत्येक दोन किलोमीटरवर मला शिर्डीला पायी येताना कुणी ना कुणी दिसतं”, अशी भावना सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली.

सुरेश वाडकर पुढे म्हणाले, पूर्वी मी शिर्डीत यायचो तेव्हा तासनतास मंदिरात बसून साईंना पाहत बसायचो. पण आता लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत. मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने भाविकांची काळजी घेते. अतिशय उत्तम पद्धतीने येथील व्यवस्था राबविली जाते.

‘नारी शक्तीबद्दल बोलता, मग तसं वागा’, कोस्ट गार्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

राजकारणाबद्दल मला काहीही माहीत नाही

यावेळी पत्रकारांनी महाराष्ट्रातील आरक्षण आणि इतर प्रश्नांबाबत सुरेश वाडकर यांना बोलते केले. यावर ते म्हणाले की, मला राजकारणाबद्दल काहीही कळत नाही. मी गाणं वाजविणारा माणूस आहे. सध्या जे काही प्रश्न आहेत, त्याबद्दल बाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सगळं व्यवस्थित करतील.