ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जळगाव येथील भाषणात त्यांनी प्रभू रामचंद्रांबाबत जो उल्लेख केला आहे त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. वाल्मिकींनी लिहिलेलं रामायणच खरं हे कसं काय मान्य करायचं? त्याआधी रामायण लिहिलं गेलं आहे. चंगेझ खानला रामायण आवडत होतं असाही उल्लेख त्यांनी केला. भालचंद्र नेमाडेंच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची चिन्हं आहेत. जळगावात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे चार दिवस उरले आहेत. अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अशात आता भालचंद्र नेमाडे यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

काय म्हणाले भालचंद्र नेमाडे?

“लेखकाला न दिसणारं सत्य सापडलं पाहिजे. राम मांसाहारी होता की शाकाहारी? हे वाचन केलं की लक्षात येतं. कशासाठी त्याची चर्चा करायची? जे खरं आहे त्याचा शोध घ्या म्हणजे समजेल. फक्त टीव्ही, भाषणं, चर्चा यातून सत्य कळणार नाही. एकच रामायण आहे का? अनेक युगांपासून रामायण लिहिलं गेलं आहे. रामानुजन यांचं ‘300 रामायणाज’ या पुस्तकात अनेक उल्लेख आहेत. चंगेझ खानला रामायण आवडत होतं. ब्रिटिश संग्रहालयात मी ते पाहिलं आहे. त्याच्यातला राम वेगळा आहे. कंबोडियातला राम वेगळा आहे. जैन रामायणातला राम वेगळा आहे. काही ठिकाणी राम आणि सीता बहीण भाऊ आहेत. काही ठिकाणी सीता रावणाची मुलगी आहे.” असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Sharad pawar mocks Amit Shah And Said this About him
Sharad Pawar : शरद पवारांनी उडवली अमित शाह यांची खिल्ली! म्हणाले, “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे….”
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”

हे पण वाचा- “प्रभू राम मांसाहारी, शंकरानेही मटण..”, ‘या’ वादग्रस्त संवादांमुळे अन्नपूर्णी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, तक्रार दाखल

वाल्मिकींनी लिहिलेला राम खरा कसा?

“रामाचं बदलत गेलेलं रुप प्रत्येक रामायणांत आहे. वाल्मिकींच्या काळात आपल्याला आत्ता आहे तसं ते रुप दिसतं. शुंगांना आवडेल असं वाल्मिकी लिहित असत. मग वाल्मिकींचा राम खरा कसा काय? शुंगांच्या दरबारी वाल्मिकी कवी होते. आसाम मधल्या करवी लोकांच्या रामायणात सीता मुख्य आहे. ती रामाला आज्ञा करते, प्रसंगी शिव्याही देते, तुला अक्कल नाही वगैरे म्हणते. हे सगळं रामायण मराठीसह सगळ्या भाषांमध्ये आलं पाहिजे. अनेक प्रकारची रामायणं आहेत हे आपल्याला ठाऊक झालं पाहिजे. ‘300 रामायणाज’ हे पुस्तक का वाचू देत नाही? त्यावर बंदी का घातली आहे?” असाही प्रश्न नेमाडे यांनी विचारला आहे. ‘मुंबई तक’ने हा व्हिडीओ प्रसारित केला आहे.

काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम हा बहुजनांचा होता. १४ वर्षे वनवासात राहिला तेव्हा त्याने मांसाहार केला असं म्हटलं होतं. तसंच आपण हवेत काही बोलत नाही हे सांगत त्यांनी वाल्मिकी रामायणात तसा उल्लेख असल्याचे पुरावेही सादर केले होते. तो वाद शमतो न शमतो तोच आता भालचंद्र नेमाडेंनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Story img Loader