अलिबाग : रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या आज झालेल्या लेखी परीक्षेच्या वेळी गैरप्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६ उमेदवारांना ताब्यात घेण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे हे ६ उमेदवार आपल्या कानाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावून बसले होते.रायगड पोलिसांनी आज लेखी परीक्षेच्या दरम्यान विशेष काळजी घेतली होती.

कॉपी रोखण्यासाठी तपासणीसाठी हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला. त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे. हे सर्व ६ जण पुरुष उमेदवार असून त्यातील ४ जण बीडमधील तर संभाजी नगर व जालना येथील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. या उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर डीव्हाइस वरून जे कुणी त्यांच्या संपर्कात होते त्यांचाही शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
Satara District Sessions Judge detained for questioning in attempt to take bribe
लाच मिळविण्याच्या प्रयत्नात सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश चौकशीसाठी ताब्यात
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध

हेही वाचा…Uddhav Thackeray : “एकनाथ शिंदे म्हणजे मोदींसमोर वळवळणारं मांडूळ, त्यामुळेच..”; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

रायगड पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या ३९१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरू आहे. कागदपत्र पडताळणी, शारीरिक क्षमता चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना आजच्या लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले होते. आज अलिबाग आणि पेण इथ ११ केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ४ हजार ७४७ उमेदवार बसले होते.

हेही वाचा…‘लाडकी म्हैस’ योजनेसाठी १५ ऑगस्टला कराडला मोर्चा, बळीराजा संघटनेचे दूधदरप्रश्नी आंदोलन

परीक्षा निर्भयपणे, शांततामय, उत्स्फूर्त वातावरणात पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावर व केंद्रा बाहेरील परिसरात १ पोलीस अधीक्षक, १ अपर पोलीस अधीक्षक, १०० पोलीस अधिकारी ५७६ अंमलदार असे एकुण ६७७ पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

Story img Loader