सोलापूर : अक्कलकोटजवळ भीषण रस्ते अपघातात दोन वाहनांची धडक बसून सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. देवदर्शन करून कर्नाटकात गावी परत जाताना भाविकांवर काळाने घाला घातला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मृतांमध्ये महिला आणी मुलांचा समावेश आहे. जखमींना अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्कलकोट-कलबुर्गी रस्त्यावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिरवळवाडी (ता. अक्कलकोट) येथे सिमेंटवाहू बल्कर गाडीला पाठीमागून क्रूझर गाडीची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. एकमेकांचे निकटचे नातेवाईक असलेले मृत भाविक आळंद ( जि. कलबुर्गी) येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण क्रूझर गाडीमध्ये (केए ३५ ए ७४९५) बसून देवदर्शनासाठी महाराष्ट्रात आले होते. देवदर्शनासाठी नेमके कोठे कोठे गेले होते, याची माहिती लगेचच समजली नाही.

हेही वाचा – सोलापूर : ‘त्या’ तरुणांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस

अक्कलकोट येथून जवळच असलेल्या आपल्या गावी परत जात असताना सीमेवरील शिरवळवाडी शिवारात सिमेंट वाहतुकीच्या बल्करला (एमएच १२ यूएम ७१८६) क्रूझरची पाठीमागून जोराची धडक बसली. मृत आणि जखमींची नावे लगेचच समजू शकली नाहीत. अपघात घडताच शिरवळवाडी परिसरातील तरुणांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलीस अधिकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघाताचे निरीक्षण करीत तपास सुरू केला आहे.