Jalna Accident Updates मोसंबीची वाहतूक करणारा आयशर टेम्पो व राज्य परिवहन महामंडळाच्या  बसमध्ये झालेल्या अपघातात ६ जण ठार तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहापूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा >>> Petrol Diesel Rates : कुठे स्वस्त तर कुठे महाग; तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव जाणून घ्या

3 children die after found under tractor during ganpati immersion procession in dhule
Ganpati Visarjan : धुळे जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली सापडल्याने तीन बालकांचा मृत्यू
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Clash between two groups in Sambarewadi near Sinhagad youth killed in firing
सिंहगडाजवळील सांबरेवाडीत दोन गटात हाणामारी, गोळीबारात तरुणाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी
heavy rain in Dharashiv district,
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
man killed in tiger attack, Bhandara District,
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; भंडारा जिल्ह्यातील घटना
Heavy rain in Yavatmal many villages flooded and flood in Panganga river
यवतमाळात मुसळधार, अनेक गावांत पाणी शिरले; पैनगंगा नदीला पूर
Wardha, Grandfather and Granddaughter Swept Away in wardha, lightning, heavy rain, bridge collapse, Hinganghat,
वर्धा : पूल खचल्याने आजोबा व नात वाहून गेले; शोधमोहीम सुरू…
Majority of dams in Nashik district overflow nashik
नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

अपघात एवढा भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून टेम्पोतील मोसंबी रस्त्यावर विखरून पडली होती. मार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली होती. महामंडळाची बस बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जात होती तर टेम्पो हा जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जात होता. दुसऱ्या वाहनाला मागे सारून पुढे जाण्याच्या घाईत समोरून येणाऱ्या बसवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलय. इतर जखमी व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.