अमरावती : परतवाडा -बैतूल मार्गावर निंभोरा फाटय़ाजवळ भरधाव कार दुचाकीला धडक देऊन नाल्यात कोसळली. या अपघातात ६ जण ठार, तर एक जण जखमी झाला. रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.

पांडुरंग रघुनाथ शनवारे (३०, रा. बोदड ता. चांदूर बाजार), सतीश सुखदेव शनवारे (३०, रा. बहिरम कारंजा), सुरेश विठ्ठल निर्मळे (२५, रा. खरपी). कारचालक रमेश धुर्वे (३०, रा. सालेपूर), दुचाकी चालक प्रतीक दिनेश मांडवकर (२६), अक्षय सुभाष देशकर (२६, रा. बोदड ता. चांदूर बाजार) अशी मृतांची नावे आहेत. संजय गजानन गायन (२२, रा. बोदड) असे जखमीचे नाव आहे.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार

परतवाडा येथील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या मजुरांना संततधार पावसामुळे त्यांच्या गावी सोडण्यासाठी दुकान मालकाने स्वत:ची कार दिली. निंभोरा फाटय़ाजवळ भरधाव कार दुचाकीला धडकली आणि नाल्यात कोसळली. या अपघातात दुचाकीस्वारासह कारमधील पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर आहे.

कारमालक आणि हार्डवेअरचे संचालक राजू चुन्नीलाल मानधने (५२, रा. परतवाडा) यांनी या घटनेची फिर्याद शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात नोंदवली.

Story img Loader