Six Time MLA Hitendra Thakur Defeated by Sneha Dubey in Vasai : वसई विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या तिरंगी लढतीत राजकारणात नवख्या असलेल्या स्नेहा दुबे-पंडित यांनी वसईच्या राजकारणात मागील तीन दशकाहून अधिक काळ आमदार राहिलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करून त्या जायंट किलर ठरल्या आहेत. वसईत भाजपच्या स्नेहा दुबे- पंडित यांनी ७७ हजार ५५३ मते मिळवून ३ हजार १५३ मतांनी ठाकूर यांचा पराभव केला आहे. वसईच्या राजकारणात पडद्यामागे राहणाऱ्या स्नेहा दुबे यांनी पडद्यासमोर येऊन चोख कामगिरी केली असून सात वर्षे आमदार राहिलेल्या आमदाराला पराभवाची धूळ चाखली आहे. यासंदर्भात त्यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला.

“वसईचा विजय हे एक उत्तम उदाहरण आहे की जनतेने ठरवलं की कोणाचाही पराभव होऊ शकतो. कारण, जनता ही जनार्दन असते. गेल्या ३५ वर्षांत वसईचा विकास खुंटला होता. त्यामुळे वसईच्या लोकांनी ठरवलं होतं की वसईत परिवर्तन करायचं. मतदार बोलून दाखवत नसले तरीही प्रचाराच्या माध्यमातून मी लोकांमध्ये फिरत होते तेव्हा मला जाणवत होतं की वसईच्या लोकांना बदल हवाय. ही लढाई मी लढलेली नाही. ही लढाई वसईच्या जनतेने सुरू केली होती आणि वसईची जनता ही लढाई जिंकली आहे”, असं सांगत हितेंद्र ठाकूर यांना कसं हरवलं याबाबत स्नेहा दुबे यांनी खुलासा केला.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?

हेही वाचा >> सत्तास्थापनेआधी महायुतीत राडा? आधी अजित पवार, आता तटकरेंच्या वक्तव्याने वातावरण तापलं; भाजपाही हतबल? नेमकं चाललंय काय?

महयुतीचा मोठ पाठिंबा मिळाल्याचंही त्या म्हणाल्या. एकनथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तसंच, आरएसएसनेही मोलाची साथ दिल्याचं त्या म्हणाल्या. “भाजपाचं पाठबळ कायमच राहिलं आहे. तसंच, आरएसएसनेही पाठिंबा दिला. आमच्यामागेही आरएसएस खंबीरपणे उभी होती. श्रमजीवी संघटनेचं खूप मोठं योगदान आहे”, असं स्नेहा दुबे म्हणाल्या.

स्नेहा दुबे राजकारणात नवख्या?

“लहानपणापासून संघर्ष आणि आंदोलनाचा खूप जवळून संबंध आला आहे. प्रशासन, पोलीस प्रशासन, मंत्रालय ते ग्रामपंचायत हे सर्व जवळून पाहिलं आहे. पॉलिसी कशा बनतात, काय काय करावं लागतं, हेही माहीत आहे. पण राजकारणात कधी येईन हा विचार केला नव्हता. २० वर्षे समाजकारणात सक्रिय आहे. संघटनेचंच काम करत राहिले. पण जेव्हा जबाबदारी येते, त्यावेळी मागे हटायचं नाही हे मी आई बाबांकडून शिकले आहे. लढाईची वेळ येते तेव्हा परिणामांचा विचार करायचा नसतो. पण वसईच्या जनतेने पाठिंबा देऊन अशक्य अशी लढाई जिंकली आहे”, असं स्नेहा दुबे म्हणाल्या.

“खूपजण म्हणतात की मी नवीन आहे. जे लोक मला ओळखतात त्यांना माहीतेय की वसईच्या राजकारणात मी जुनी आहे. १९९४ मध्ये भाऊंनी निवडणूक लढवली होती. तेव्हा मी चौथीत होते. तेव्हा पॅम्प्लेट वाटण्यापासून एसटीचा लढा, गावबाचव लढ्यात मी सक्रिय होते. पोलिसांचा मार खाण्यापासून पायी चालत जाण्यापर्यंत मी सर्वकाही केलं. संपूर्ण वसईभर पथनाट्य केलं. बालपण पूर्ण वसईत गेल्याने वसईसाठी मी नवीन नाहीय. गेली ५ ते ७ वर्षे श्रमजीवी संघटना महायुतीला पाठिंबा देत आली आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मी सक्रिय होते. राजकारणात नवी नाही, फक्त पडद्यामागे होते”, असंही स्नेहा दुबे म्हणाल्या.

Story img Loader