दापोली परिसरात सहलीसाठी आलेल्या सहा जणांचा रविवारी सकाळी समुद्रात बुडून मृत्यू झाला़ तर तिघा जणांना स्थानिक रहिवाशांनी वाचवले. संगीता ओझा (३४), पवन डांगी (६), श्रुती डांगी (१३), श्याम डांगी (२५), सरिता डांगी (२२) आणि अर्पण शर्मा (८), अशी मृतांची नावे आहेत़
ओझा या श्याम डांगी यांची बहीण, तर अर्पण शर्मा हा त्यांच्या दुसऱ्या बहिणीचा मुलगा होता.
दापोलीपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आंजर्ले परिसरात पुण्याहून चार कुटुंबे खासगी मिनी बसने सहलीसाठी आली होती. आंजल्र्याच्या खाडीवर अडखळ पुलाजवळ त्यापैकी नऊ जण आंघोळीसाठी समुद्रात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले गेले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी समुद्रात उडय़ा टाकून त्यापैकी तिघांना वाचवले, पण उरलेले सहा जण बुडाले. त्यापैकी चौघांचे मृतदेह दुपापर्यंत हाती आले, अन्य दोघांचा तपास संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होता.
पुण्याचे सहा जण दापोलीत बुडाले
दापोली परिसरात सहलीसाठी आलेल्या सहा जणांचा रविवारी सकाळी समुद्रात बुडून मृत्यू झाला़ तर तिघा जणांना स्थानिक रहिवाशांनी वाचवले.
First published on: 26-05-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six tourist dead