छत्रपती संभाजीनगर / हिंगोली : छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांतील दोन तरुणांनी गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. मराठा किंवा धनगर आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलण्याच्या सहा घटना गेल्या सात दिवसांत राज्यभरात घडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथे गणेश काकासाहेब कुबेर (२८) या तरुणाने गुरुवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व दोन मुले असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी नगरमध्ये २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या, फलकावर लिहिला ‘हा’ संदेश

चिखलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी असलेल्या गणेश यांनी ‘जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका,’ असे घरात असलेल्या एका फळय़ावर लिहिले होते. तर हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरनजिक देवजना गावातील कृष्णा कल्याणकर (२५) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली आहे. १९ ऑक्टोबरला जालन्यातील एका व्यक्तीने मुंबईत आत्महत्या केली होती. त्यानंतर २२ तारखेला बीड व नांदेडमध्ये दोन तरुणांनी जीवन संपविले. तर २३ तारखेला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ३८ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली होती.