‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु स्पर्धेमध्ये मंगळवारी झालेल्या रत्नागिरी विभागीय प्राथमिक फेरीतून सहा स्पर्धकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही फेरी येत्या रविवारी (१० मार्च) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे.

या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष असून या वर्षी ‘मी -टू’ पणाची बोळवण, ‘क्लोनिंग-माकडानंतर माणूस’, चरित्रपटांचे चारित्र्य, ‘खेळ की नायक’ हे चार विषय प्राथमिक फेरीसाठी देण्यात आले आहेत.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधील स्पर्धक मंगळवारी प्राथमिक फेरीत सहभागी झाले. विशेष म्हणजे, या स्पर्धकांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त स्पर्धकांनी ’मी-टू पणाची झाली बोळवण’ हा विषय भाषणासाठी निवडला. त्या खालोखाल ’क्लोनिंग-माकडानंतर माणूस’ या विषयाला स्पर्धकांची पसंती होती.

बहुतेक स्पर्धकांचे सादरीकरण प्रभावी होते. पण निवडलेल्या विषयाबद्दलची माहिती समाजमाध्यमांवर उपलब्ध माहितीपेक्षा फारशी वेगळी नव्हती, याबद्दलची खंत स्पर्धेचे परीक्षक आदित्य कुलकर्णी आणि सई साने यांनी स्पर्धेनंतर मनोगतामध्ये व्यक्त ऐकेली. ‘पितांबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व’स्पर्धेचे असोसिएट पार्टनर श्री धृतपापेश्वार आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत.

या स्पर्धेचे पॉवर्ड बाय पार्टनर वास्तु रविवार, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.

विभागीय फेरीतील विजेता १७ मार्च रोजी मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीत रत्नागिरी विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

प्राथमिक फेरीचा निकाल

१. कौस्तुभ फाटक (देव, घैसास, कीर महाविद्यालय, रत्नागिरी)

२. सबा असिफ बंद्री (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)

३. ह्रषिकेश वैद्य (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)

४. राजेश्वरी पाटील (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण)

५. श्रेया कुलकर्णी (दादासाहेब तिरोडकर महाविद्यालय, पणदूर, जि.सिंधुदुर्ग)

६. प्रतीक सरकाळे (शरदचंद्रजी पवार अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, खरवते)

‘पीतांबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर व पुनित बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्टिटय़ूशन्स, इंडियन ऑईल कॉपरेरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.