सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने पंढरपुरात येणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केलेल्या १२९ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारण्याच्या आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शासनाच्या शिखर समितीने मान्यता दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, आणि चैत्री अशा चार वाऱ्या भरतात. त्यावेळी लाखो वारकरी आणि भाविक येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या दर्शन मंडप रांगेत लेख समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः वारी काळात विठ्ठल दर्शनासाठी २४ ते ३० तासांचा अवधी लागत असताना भाविकांना बसण्यासाठी सुविधा नाही. आपत्कालीन व्यवस्थेसह वैद्यकीय सुविधा पुरविण्यास अडथळा येतो. शौचालय सुविधा मिळत नाही. दर्शन रांगेत सुधारणा होण्याच्या दृष्टीने यापूर्वी २०१८ साली विठ्ठल मंदिर समितीने दर्शन हॉल बांधकाम आणि स्काय वॉक उभारण्याचा ठराव मंजूर केला होता. परंतु त्यावर पुढे काही हालचाली झाल्या नव्हत्या.

हेही वाचा >>>पंढरपुरातील धनगर उपोषण स्थगित; आरक्षणाचा लढा सुरूच राहणार

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दर्शन मंडप हॉल आणि स्काय वॉक वाढण्यासाठी शासनाकडे आराखडा सादर केला होता. अगोदर शासनाच्या उच्च अधिकार समितीने मंजुरी दिली होती. तर आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीनेही मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आठ दिवसात निघेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केली आहे.

प्रस्तावित दर्शन मंडपामध्ये पिण्याचे पाणी, शौचालय, उद्वहन (लिफ्ट), वैद्यकीय सुविधा, अल्पोपहार, आपत्कालीन मार्ग, प्रसाद, सुरक्षा व्यवस्था आणि हिरकणी कक्ष, दिव्यांग सुविधा, अत्यावश्यक वाहन व्यवस्था आदी सुविधा समाविष्ट आहेत. स्काय वॉकमुळे स्थानिक नागरिकांना दर्शन रांगेचा कोणताही त्रास होणार नाही. भाविकांना दर्शनाचा कालावधी कमी करणे शक्य होणार आहे. भाविकांना अन्नछत्राच्या माध्यमातून विनामूल्य जेवणाची सुविधा पुरवली जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skywalk for vitthal rukmini darshan in pandharpur approval of the summit committee headed by the chief minister amy