गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडकडून (गेल) नैसर्गिक वायूचा पुरवठा काही प्रमाणात सुरू झाल्यामुळे रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्लान्ट कंपनीतून (आरजीपीपी) अंशत: वीज उत्पादन सुरु झाले आहे.
करारानुसार गॅसपुरवठा होऊ न शकल्यामुळे गेल्या जुलै महिन्यापासून या प्रकल्पातून वीजनिर्मिती पूर्णपणे बंद पडली होती. या संदर्भात विविध शासकीय पातळ्यांवर गॅस पुरवठय़ासाठी प्रयत्न चालू होते. अखेर त्याला यश येऊन गेल कंपनीकडून गॅस उपलब्ध झाल्यामुळे गेल्या शनिवारपासून (७ डिसेंबर) दररोज ३१० मेगाव्ॉट वीजनिर्मिती होऊ लागली आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता दररोज १९६७ मेगाव्ॉट निर्मितीची आहे. गेल कंपनीकडून सुमारे तीन आठवडे वीजपुरवठय़ाची हमी मिळाली आहे. त्यानंतर पुन्हा याबाबत अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुरवठय़ाचे प्रमाण वाढण्याबाबतही हमी मिळू शकलेली नाही. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा