रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथे २२ हजार लिटर पेट्रोल भरलेला टँकर (एम एच ०८ एपी ०७७७) च्या टायर मधून धूर येऊ लागल्याने एका नागरिकाच्या सतर्कतेमूळे मोठा अनर्थ टळला. टँकरने पेट घेण्या आगोदरच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक यंत्रणेने टँकरच्या टायरमधून येणाऱ्या धूरावर पाणी मारले.
रत्नागिरीतील एका पेट्रोल पंपाच्या मालकीचा टँकर पेट्रोल घेऊन दुपारी एक वाजता मिरज इथून निघाला होता. तो उद्यमनगर येथील एका पंपावर पेट्रोल खाली करण्यासाठी जात असताना ही घटना घडली. टायरच्या कल्च प्लेटा गरम झाल्याने हा धूर येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरातील एका नागरिकाला हा प्रकार लक्षात आल्याने त्याने तात्काळ टँकर चालकाला सांगितले.
आणखी वाचा-बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
त्यानंतर तात्काळ रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी व एमआयडीसीचे कर्मचारी तात्काळ घटनेच्या ठिकाणी हजर झाले पाणी मारून गाडीचे टायर थंड केले. वेळीच नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. रत्नागिरीत गॅस टँकर मधून काही दिवसापूर्वी वायू गळती झाल्यानंतर आता पेट्रोल टँकर मधून धूर येण्याच्या प्रकार घडला. महामार्गाच्या कामामुळे रस्त्याची झालेल्या दुरावस्थेमुळे असे अपघात होत असल्याने रत्नागिरीत आता घबराटीचे वातावरण पसरले आहे.