दीड वर्षांत सहा हजार जणांना साप व िवचू दंश, सहा जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्य़ात सर्प दंश आणि िवचू दंशाच्या प्रमाणात मोठी वाढ दिसून आली आहे. गेल्या दीड वर्षांत जिल्ह्य़ात सहा हजारहून अधिक जणांना सर्प व िवचू दंशाची बाधा झाली असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
कर्जत तालुक्यातील पोशीर चिकनपाडा येथे साप चावल्याने दोन भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सिमरन शहाबाज शेख आणि रैसुद्दीन जयनुद्दीन शेख अशी या दोघांची नावे होती. चिकनपाडा येथील एका फार्म हाऊसवर रात्री दोघे झोपले असताना ही घटना घडली. दोघांनाही रात्री झोपेत सर्पदंश झाल्याचे समोर आले. यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दीड महिन्यांपूर्वी घडलेल्या या दुर्घटनेने कर्जत परिसर हादरून गेला. यामुळे सर्पदंश आणि िवचुदंशाचा मुद्दा पुन्हा एकदा चच्रेत आला.
१ एप्रिल २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या मागील १७ महिन्यांत जिल्ह्य़ात २ हजार ६६४ जणांना सर्पदंश झाला तर ३ हजार ३६७ जणांना विंचुदंश झाला. यात सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सुदैवाने सर्पदंशाचे प्रमाण वाढत असले तरी त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटत चालले आहे. योग्यवेळी उपचार मिळाल्याने सर्पदंश आणि िवचु दंशामुळे दगावणाऱ्याची संख्या घटली आहे.
सर्वाधिक प्रमाण अलिबागमध्ये
सर्प व विंचुदंशाचे सर्वाधिक प्रमाण अलिबाग तालुक्यात आहे. पनवेल, कर्जत, खालापूर, महाड, माणगाव या तालुक्यांमध्येही सर्प व विंचुदंशाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. ही एक चिंताजनक बाब आहे.
सर्पदंश अथवा िवचुदंश झाल्यास तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत.
-डॉ. बाहुबली नागावकर, जिल्हा शल्यचिकित्सक