भाजपा नेते नितेश राणे यांनी आज ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना थेट इशारा दिला आहे. संजय राऊतांनी भाजपा नेत्यांविरोधात वक्तव्य करणं थांबवावं अन्यथा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडू, असं नितेश राणे म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना इशारा दिला आहे. तसंच, ही पत्रकार परिषद संजय राऊतांनी सेव्ह करून ठेवावी, जेणेकरून मी वॉर्न केलं नव्हतं असं होणार नाही, असंही नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे म्हणाले की, “संजय राऊतांनी माझी पत्रकार परिषद ऐकावी आणि सेव्ह करून ठेवावी, कारण नंतर म्हणाल की, नितेश राणेंनी मला वॉर्न केलं नव्हतं, मला सांगितलं नव्हतं की माझी एवढी इज्जत काढणार आहे. यापुढे आमच्या कोणत्याही नेत्यावर खोटा आरोप केला, अपशब्द वापरलात तर संजय राऊतांनी लक्षात ठेवावं, आम्ही ओरिजनल शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे ओरिजनल शिवसैनिक म्हणून मोठे झालो आहेत. संजय राऊतांसारखा चायनीज मॉडेल नाही.”
हेही वाचा >> विखे पाटलांच्या मुख्यमंत्रिपदावरून अब्दुल सत्तारांचं वक्तव्य, म्हणाले, “माझी छाती फाडून…”
“संजय राऊतांसारखी माणसं बाजारात विकत मिळतात, चोर बाजारात फार स्वस्त दरात भेटतात. त्यांना कोणीही विकत घेऊ शकतात. संजय राऊत भाजपाच्या नेत्यांबद्दल बोलले तर मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे कपडे ठेवणार नाही. टराटरा फाडेन. त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर बोलावं, मग अर्ध्या तासात सगळे कपडे फाडण्याचं काम करेन. आता त्यांनी ठरवावं की उद्धव ठारकेंचे किती कपडे ठेवावेत”, अशा शब्दांत नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे.
“आदित्य ठाकरेंवर खुनाचा गुन्हा”
“नारायण राणे ३९ वर्षे बाळासाहेबांसोबत राहिले. आम्हाला सगळ्या गोष्टी माहितेय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सर्व गोष्टी माहिती आहे. यापुढे बोलताना विचार करून बोलावं. उद्ध ठाकरेंचा फोटो बघून बोलावं. भ्रष्टाचाराचे आरोप करायची खुमखुमी आहे. तुम्हाला वाटत असेल ईडी, सीबीआय भाजपामध्ये आल्यावर चौकश्या बंद करते. तुमच्याकडे पुरावे असतील तर मीडियासमोर पळण्याची गरज नाही. कोर्ट आहे. कोर्टात जा, कोणी थांबवलंय? आम्ही हात बांधलेले नाहीत,” असं नितेश राणे म्हणाले.
“भ्रष्टाचाराचा आरोप ठाकरेंवरही झाला आहे. खुनाचा आरोप आदित्यवरही झाला. नंदकिशोर चर्तुर्वेदी, पाटणकरांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. दिशा सालियनसह खुनाचे संबंध बाहेर येतील. यासंबंधित ऐकण्याची तयारी ठेवावी”, असंही नितेश राणे म्हणाले.