रोहा येथे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत साखर कारखान्यांच्या विक्री संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व मेधा पाटकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना घोटाळे-महाघोटाळ्यांचे आरोप करणे ही फॅशन झाली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाचे राज्य सचिव अल्लाउद्दीन शेख यांनी आज रोहा येथे निषेध केला आहे.
भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाचे राज्य सचिव अल्लाउद्दीन शेख आज रोहा येथे आले होते. येथील समितीच्या कार्यकर्त्यांशी वार्तालाप केल्यानंतर पवारांच्या वरील वक्तव्याबद्दल त्यांना विचारले असता. शरद पवार यांच्या वरील वक्तव्याचा निषेध करीत अल्लाउद्दीन शेख यांनी सांगितले की, मी स्वत: साखर कारखान्यांत नोकरी केलेली आहे. कारखानदार कसे भ्रष्ट आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. पवारांनी नाहक नाकाने कांदे सोलू नयेत व एक जबाबदार केंद्रीय मंत्री असताना. त्यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत जनतेची माफी मागावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अण्णा हजारे व मेधा पाटकर यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून नेहमीच जबाबदारीने व पुराव्यांसह आरोप होत असतात. राष्ट्रवादीचे मंत्रीगण हे सर्वात जास्त विविध भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये नावारूपाला येत आहेत. आपल्या मंत्र्यांवर वचक ठेवून भ्रष्टाचाराला विरोध करणे हे पवार साहेबांकडून अपेक्षित आहे. त्यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे आपल्या बगलबच्च्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याने आमची त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे ते म्हणाले.
देशात सुरू असलेल्या घोटाळ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या जेष्ठ व्यक्तींची अशाप्रकारे खिल्ली उडविणे आणि ही कृती एका जबाबदार केंद्रीय मंत्र्यांकडून होणे, ही बाब म्हणजे लोकशाही दडपण्याचे प्रयत्न असल्याचे मत त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष आणि निवृत्त मुख्याध्यापक अहिरे गुरूजी. अ‍ॅड. सुनील सानप, महादेव सरसंबे,  दिलीप वडके, मििलद अष्टिवकर, जितेंद्र जोशी, राजेंद्र जाधव, अमोल करळकर आदींसह जनआंदोलनाचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा