लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : कोकणातील पाचही जिल्ह्यात समाज माध्यमांवर लक्ष्य ठेवण्यासाठी निंयत्रण कक्षाची निर्मिती केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातून या उपक्रमाची सुरूवात होणार असून, जिल्हा नियोजन समितीकडून यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक संजय दराडे यांनी दिली.

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Traffic changes due to flyover work at Savitribai Phule Pune University Chowk Pune news
पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?

ते अलिबाग येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते. सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, हीबाब लक्षात घेऊन पोलीस दलाकडून कोकणातील पालघर, ठाणे ग्रामिण, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात समाज माध्यम निंयत्रण कक्षाची स्थापना केली जाणार आहे. तसे निर्देश पाचही जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांना देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातून या उपक्रमाची सुरुवात होणार असून, जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. पुढील एक महिन्यात हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित होईल अशी माहिती दराडे यांनी दिली.

आणखी वाचा-Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंनी मौन सोडलं, वाल्मिक कराडविषयीही मांडली भूमिका!

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकण विभाग हा संवेदनशील आहे. दहशतवादी कारवायांसाठी कोकण पट्टीचा यापुर्वी वापर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात सागरी सुरक्षा बळकटीकरणासाठी पोलीस दलाकडून व्यापक पाऊले उचलण्यात आली आहेत. सागरी पोलीस ठाण्यांच्या निर्मिती करून, त्या ठिकाणी प्रशिक्षीत कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. किनारपट्टीवर बेकायदेशीर कारवायांना आळा बसावा यासाठी वेगवान गस्ती नौका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बोटींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तटरक्षक दलाकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. किनारपट्टीवर काम करणाऱ्या विवीध सुरक्षा यंत्रणामध्ये समन्वय असावा यासाठी नौदल, तटरक्षक दल, पोलीस, कस्टम्स यांच्या नियमित बैठकांचे आयोजन केले जात आहे. यामुळे सागरी सुरक्षेला बळकटी मिळेल असा विश्वास दराडे यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-Somnath Suryavanshi : मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करताच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई काय म्हणाल्या?

कोकण किनारपट्टीवर डिझेल तस्करीचे प्रकार समोर आले आहेत. मात्र डीझेल तस्करांविरोधात व्यापक कारवाई पोलीस दलाने सुरू केली असून, रायगड, रत्नागिरी आणि सिँधुदुर्ग जिल्ह्यात या प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून, तस्करी करणाऱ्यांविरोधात व्यापक कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात सायबर अरेस्टचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे असे फोन आल्यास नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कुठल्याही तपास यंत्रणा तुम्हाला फोनवर करून, तुमच्यावर गुन्हा दाखल असल्याचे सांगून, अटक करू शकत नाहीत. हे लक्षात घ्यायला हवे. असे फोन कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहनही दराडे यांनी केले.

Story img Loader