सोशल मीडिया स्टार हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हिंदुस्थानी भाऊने उर्फी जावेदला तोकडे कपडे परिधान न करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, हिंदुस्थानी भाऊ सध्या वेगळ्याच कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने माझ्या कुटुंबीयांना दहशतवादी संघटना आएसआयकडून धमक्या येत असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्याने सुरक्षेचीदेखील मागणी केली आहे.
हेही वाचा >>> शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कोण हवं? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? संतोष बांगर स्पष्टपणे म्हणाले, “आम्हाला तर…”
हिंदुस्थानी भाऊने शनिवारी (२१ जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्याने माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्याने कुटुंबीयांना आयएसआयकडून धमक्या येत असल्याचे सांगितले. “मला पाकिस्तान, आयएसआयकडून अनेकवेळा धमकी मिळालेली आहे. ज्या नंबरवरून मला धमकी मिळालेली आहे, तो नंबर मी पोलिसांना दिला आहे. माझ्या परिवारासह मलाही या धमक्या दिल्या जात आहेत. मी त्यांना घाबरत नाही. पण परिवारासाठी मी सुरक्षेची मागणी केली आहे,” असे हिंदुस्थानी भाऊने सांगितले.
हेही वाचा >>> गुजरात दंगल आणि नरेंद्र मोदींवरील ‘बीबीसी’चा माहितीपट Youtube आणि ट्विटरवर ब्लॉक, केंद्राच्या आदेशानंतर कारवाई
हिंदुस्थानी भाऊने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेदेखील कौतूक केले. याआधीच्या सरकारने काय केले, याबाबत मला माहिती नाही. मात्र महाराष्ट्राला तत्काळ निर्णय घेणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच भेटला आहे. मला एकनाथ शिंदे याचा आशीर्वाद आहे. मला आणखी काहीही नको, असेही हिंदुस्थानी भाऊने सांगितले.
हेही वाचा >>> “आजपासून तुझं नाव गांजा काळे”; गजानन काळेंच्या ‘त्या’ विधानावर अभिजीत बिचुकलेंचं प्रत्युत्तर; राज ठाकरेंचाही केला उल्लेख!
दरम्यान, साधारण वर्षभरापूर्वी हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली होती. इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द व्हाव्यात या मागणीला घेऊन विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. अटकेवेळी हिंदुस्थानी भाऊच्या समर्थनार्थ हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तेव्हादेखील हिंदुस्थानी भाऊ चांगलाच चर्चेत आला होता.