सांगली : ६० लाखाच्या अनुदानासाठी एक लाख रुपयांची लाच घेत असताना सातारा जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे यांना बुधवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्यांच्यासोबत धनादेशसाठी १० हजार लाच मागणी केल्याबद्दल एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

तक्रारदार यांच्या संस्थेस शासनामार्फत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमांना नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत ५९ लाख ४० हजाराचे अनुदान मंजूर करण्यात आलेले होते. सदर अनुदानाचा पहिला हप्ता २९ लाख ७० हजार रूपये शाळेस अदा करण्यात आलेला असून सदर रक्कम दिलेचा मोबदला म्हणून १० टक्के व दुसरा हप्ता २९, हजार ७० हजार रूपये देणेसाठी १० टक्के असे एकुण  सुमारे ६ लाग रूपये लाचेची मागणी अनुदान मंजूर करण्यासाठी केली असल्याबाबतचा तक्रार करण्यात आली होती.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी

हेही वाचा >>>विजय मिळवणाऱ्या अपक्ष विशाल पाटीलना ४८.८९ टक्के मते

लाचलुचपत सांगली विभागाच्या पथकाने बुधवारी

इतर मागास बहुजन कल्याण विभाग समाज कल्याण सांगली या ठिकाणी सापळा लावला असता  सपना घोळवे (वय ४०) यांना तक्रारदार यांचेकडून एक लाख रुपयांची रंगेहाथ पकडण्यात आले. श्रीमती घोळवे यांच्याकडे सांगलीचा अतिरिक्त कार्यभार आहे. तसेच दिपक भगवान पाटील (वय ३६ वर्षे, समाज कल्याण निरीक्षक) यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याने त्यांना देखील ताब्यात घेणेत आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अमोल तांबे, उप अधिक्षक विजय चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी व कर्मचारी सिमा माने, अजित पाटील, प्रितम चौगुले, सलीम मकानदार, धनंजय खाडे, ऋषीकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव, चालक अनिस वंटमुरे  यांच्या पथकाने ही कारवाई केली.