इचलकरंजीतील पंचगंगा नदीतील फोफावलेली जलपर्णी दूर करण्यासाठी आता सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. नगरपालिका प्रशासनाच्या वतीनेही जेसीबी यंत्र पुरवून मदत केली जात आहे. यामुळे जुन्या पुलाची जलपर्णीने भरलेले दोन गाळे मोकळे झाल्याने जलपर्णी पुढे सरकण्यास वाट मिळाली आहे.
पंचगंगा नदीपात्रामध्ये उन्हाळय़ामध्ये जलपर्णी नदीचे पात्र व्यापून राहिली होती. पावसामुळे नदीपात्राचा विस्तार झाला. नदीचे पाणी घाटापर्यंत आले. त्याबरोबर जलपर्णीनेही घाटाचा उंबरठा गाठला. नदी जलपर्णीमय झाल्यामुळे हे दृश्य सर्वाना वेदनादायी होते. त्यामुळे जलपर्णी हटविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.
नगरपालिकेच्या वतीने जेसीबी यंत्र पुरविले आहे. त्याद्वारे जलपर्णी काढण्याचे काम गतीने सुरू झाले आहे. माजी नगरसेवक रॉकी डिसोझा यांच्यासह तरुण मंडळाचे कार्यकर्ते जलपर्णी हटविण्याच्या कामात उतरले आहेत. शिरदवाड सेवा सोसायटीतील सुमारे १५० युवक व ग्रामस्थांनी जलपर्णी काढण्यास सुरुवात केली. ट्रॅक्टरला हुक बांधून जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी जलपर्णी काढण्यास सुरुवात केल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शनिवारी माजी मंत्री प्रकाश आवाडे हेही या उपक्रमात सहभागी झाले. त्यांनी या मोहिमेस काही काळ हातभार लावला. नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी या मोहिमेची पाहणी केली.
पंचगंगातील जलपर्णी काढण्यास सामाजिक कार्यकर्ते सरसावले
इचलकरंजीतील पंचगंगा नदीतील फोफावलेली जलपर्णी दूर करण्यासाठी आता सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. नगरपालिका प्रशासनाच्या वतीनेही जेसीबी यंत्र पुरवून मदत केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-06-2013 at 12:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social workers came forward for cleaning panchganga