सोलापूर : एका भरधाव मोटारीने समोरून ठोकल्यामुळे घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघा जणांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जखमी झाला. बार्शी-येरमाळा मार्गावर पाथरी (ता. बार्शी) गावच्या शिवारात हा अपघात झाला.

सारिका नितीन चव्हाण (वय ३२, रा. गुंडेगाव, जि. अहिल्यानगर) आणि महामुनी ऊर्फ बटऱ्या गुलच्या काळे (वय ४०, रा. वालवड, ता. भूमी, जि. धाराशिव) अशी या अपघातातील दोघा मृतांची नावे आहेत. या अपघातात रवींद्र बाबूराव चंद्रवंशी (रा. नायगाव, ता. हवेली) हा जखमी झाला.

हेही वाचा – कांद्याची आवक वाढल्याने सोलापुरात कांदा दरात घट

हेही वाचा – Sunil Tatkare : केंद्रातील मंत्रिपद सुनील तटकरेंना मिळणार की प्रफुल्ल पटेलांना? तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

u

सारिका चव्हाण आणि महामुनी काळे हे चंद्रवंशी याच्यासह येरमाळा येथील एका साखर कारखान्यासाठी ऊसतोड करीत असलेल्या बहिणीस भेटण्यासाठी दुचाकीवर बसून निघाले होते. बार्शी-येरमाळा रस्त्यावर पाथरी गावच्या शिवारात समोरून येणाऱ्या भरधाव मोटारीची धडक बसल्याने दुचाकीवरील सारिका आणि महामुनी या दोघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. या संदर्भात मोटारचालक हनुमंतराव शेषराव शिंदे (रा. सिरसदेवी, ता. गेवराई, जि. बीड) याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader