सोलापूर : कृष्णा खोऱ्यात एकीकडे महापुराचे संकट ओढवले असताना दुसरीकडे दुष्काळी माण प्रदेशातील सांगोला व मंगळवेढ्यासह जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, माण, खटाव भागातील जनता दुष्काळाचे अरिष्ठ ओढू नये म्हणून प्रार्थना करीत आहे. त्याचा विचार करून महापुराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी माण प्रदेशात वळवावे, अशी मागणी सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे २००३-०४ साली उपमुख्यमंत्री असताना कृष्णा खोऱ्यातील दरवर्षी येणाऱ्या महापुराचे पाणी भीमा खोऱ्यात वळवून सोलापूर, सांगली, सातारा, पुणे तसेच शेजारच्या मराठवाड्यातील धाराशिव, बीड आदी सहा जिल्ह्यांतील ३६ तालुक्यांना देण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करून घेतली होती. नंतर राजकीय शह-काटशहाच्या राजकारणात ही योजना बासनात गुंडाळून ठेवण्यात आली होती. तथापि, अलीकडे जागतिक बँकेने या योजनेसाठी अर्थसाह्य मंजूर केले आहे.

chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
bachu kadu criticized government over farmers suicide
“मरणारा शेतकरी हिंदू नाही का?”, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक; अमरावतीत मोर्चा
Comprehensive development of the village in Palghar district with the help of schemes
समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास
Two men commit unnatural torture on a minor child in Buldhana district
आता…बालकेही सुरक्षित नाहीत!…खामगावच्या शाळेत अंध मुलावर…

हेही वाचा – Prakash Ambedkar : “उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका दुर्दैवी”; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “भांडणं मिटवण्याऐवजी…”

हेही वाचा – पूरग्रस्तांनो घरी परतू नका… सांगलीत पाणीपातळीत घट तरीही वाढीव विसर्गाने भीती

या पार्श्वभूमीवर यंदा कृष्णा खोऱ्यात कोल्हापूर व सांगलीत आलेल्या महापुराच्या संकटाचा विचार करता हे महापुरात वाहून जाणारे १०५ टीएमसी पाणी भीमा खोऱ्यात वळविण्याची मागणी प्रकर्षाने होत आहे. आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी हाच धागा पकडून शासनाकडे मागणी केली आहे.

Story img Loader