सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील अंतिम प्रारूप मतदार यादी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. यात एकूण मतदार संख्या ३७ लाख ६३ हजार ९७९ एवढी आहे. जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी अक्कलकोट मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख ७४ हजार ५३६ मतदार आहेत. तर सर्वांत कमी तीन लाख २२ हजार २४० मतदार सांगोला मतदारसंघात आहेत.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्याची अंतिम प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली. एकूण मतदारांमध्ये पुरुष मतदार १९ लाख ३५ हजार ९७९ तर महिला मतदार १८ लाख २७ हजार ५०८ एवढे आहेत. ६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान ७५ हजार ८२४ नवमतदारांची वाढ झाल्याचे दिसून येते.

Sakal Dhangar Samaj decided hunger strike in Pandharpur
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ९ सप्टेंबरपासून पंढरपुरात उपोषण
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Solapur, fake doctors, municipal administration, Tukaram Mundhe, Maharashtra Medical Practitioners Act, fake doctors in Solapur, Solapur news, latest new
सोलापुरात तोतया डॉक्टरवर महापालिका प्रशासनाची कारवाई, जिल्ह्यात २५० तोतया डॉक्टर असण्याचा अंदाज
amol kolhe on pm narendra modi
Amol Kolhe: “पुतळ्यानं स्वतःहूनच मान टाकली…”, पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यानंतर डॉ. अमोल कोल्हेंची कवितेमधून प्रतिक्रिया
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
BJP Leader Said This Thing About Ajit Pawar
Mahayuti : महायुतीत ठिणगी? “अजित पवारांबरोबरची युती म्हणजे असंगाशी संग, त्यांनाही..”, भाजपा नेत्याचं वक्तव्य
Ajit Pawar On Tanaji Sawant
Ajit Pawar : तानाजी सावंतांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मला काहीही देणंघेणं…”
Sanjay Raut On PM Narendra Modi
Sanjay Raut : “मोदींनी मागितलेली माफी राजकीय”, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल; म्हणाले, “निवडणूक डोळ्यासमोर ठेवून…”

हेही वाचा…Badlapur Sexual Assault : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, शाळेच्या दोन विश्वस्तांबाबत एसआयटीने दिली ‘ही’ माहिती

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे : करमाळा-तीन लाख २४ हजार ३५, माढा-तीन लाख ४४ हजार ५४७, बार्शी-तीन लाख २७ हजार ६५७, मोहोळ राखीव-तीन लाख २५ हजार ९९९, सोलापूर शहर उत्तर- तीन लाख २२ हजार ६६८, सोलापूर शहर मध्य-तीन लाख ३९ हजार ६०८, अक्कलकोट-तीन लाख ७४ हजार ५३६, दक्षिण सोलापूर-तीन लाख ७२ हजार ५५३, पंढरपूर-तीन लाख ६५ हजार ७२५, सांगोला-तीन लाख २२ हजार २४० आणि माळशिरस राखीव -तीन लाख ४४ हजार २२१.

जिल्ह्यात सर्व अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये ३७२३ मतदान केंद्रे राहणार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत १२४ मतदार केंद्रांची नव्याने वाढ झाली आहे. एकूण ३७२३ मतदान केंद्रांमध्ये शहरी ११७७ तर ग्रामीण २५४६ मतदान केंद्रांचा समावेश आहे, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

हेही वाचा…Raosaheb Danve : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंवर भाजपाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

नागरिकांनी आपली नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट असल्याबाबतची खात्री करावी. नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये नसतील ते नागरिक निरंतर प्रक्रियेमध्ये नाव नोंदणी करू शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले