महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांवरील लंपी रोगाने थैमान घातलं आहे. यामुळे पशू पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रोगामुळे राज्यभरातील जनावरांचे अनेक आठवडे बाजारदेखील बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु, या संसर्गजन्य आजारावर सोलापुराच्या एका शेतकऱ्याने शक्कल लढवत एत उपाय शोधून काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोरोना काळात पीपीई किट घालून काम करणारे आरोग्यसेवक आपण पहिलेच असतील. आता लंपी रोगापासून खबरदारी घेण्यासाठी थेट जनावरांसाठी पीपीई किट बनवण्याची किमया सोलापुरातील एका शेतकऱ्याने केली आहे. सांगोला तालुक्यातील महूदचे शेतकरी जितेंद्र बाजारे यांनी हे पीपीई किट तयार केलं आहे. या पीपीई किटमुळे पशुपालकांची चिंता काही अंशी कमी होईल, असा विश्वास बाजारे यांनी व्यक्त केला.