सोलापूर : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणालीद्वारे सोलापूर विमानसेवेचा होणारा औपचारिक शुभारंभ पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडला आहे. हा औपचारिक शुभारंभ लांबणीवर पडला तरी प्रत्यक्षात सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यास आणखी दोन ते अडीच महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सोलापूरच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित विधानसभेचा औपचारिक शुभारंभ आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घाईगडबडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्याचा मुहूर्त साधण्यात आला होता. परंतु पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने आणि पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे सोलापूर विमानसेवेचा औपचारिक शुभारंभही लांबणीवर पडला आहे.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश

हेही वाचा >>>परवानगी नाकारूनही रोहित पवार यांनी केले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

केंद्र सरकारने यापूर्वी १५ जून २०१६ मध्ये उडान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातच सोलापूर विमानसेवेला मंजुरी दिली होती. परंतु त्या अनुषंगाने सोलापूरच्या छोटेखानी विमानतळावर आवश्यक सुविधांचा अभाव असल्यामुळे उडान योजनेपासून सोलापूर वंचित राहिले होते. त्यानंतर फारशा हालचाली न झाल्यामुळे सोलापूरची विमानसेवा दुर्लक्षित होती.

दरम्यान, विमानतळालगत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची ९२ मीटर उंच चिमणीचा असलेला कथित अडथळा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने गेल्या वर्षी दूर केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही सोलापूरच्या विमानसेवेसाठी जातीने लक्ष घालून पाठपुरावा सुरू केला होता. नियम व अटींनुसार विमानतळावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या. त्या दृष्टीने सर्व सोपस्कार युद्ध पातळीवर पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सोलापूर विमानतळावरून नागरी विमान वाहतुकीस परवानगी दिली.

सुरुवातीला मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय हैदराबाद आणि तिरुपतीकरिताही विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर विमानतळाची धावपट्टी तुलनेने छोट्या आकाराची म्हणजे २००९ मीटर लांबीची असल्यामुळे येथून ४० आणि ७२ आसन क्षमतेची विमानसेवा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तीन कंपन्यांनी प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर रीतसर शिक्कामोर्तब व्हायचे आहे. ही प्रक्रिया राबविण्यासाठी येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच विमानसेवा सुरू होणे शक्य आहे. तोपर्यंत सोलापूरकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.