सोलापूर : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भाग म्हणून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना एका वाहनात ८५ किलो गांजाचा साठा पोलिसांना आढळून आला. या जप्त गांजाची किंमत सुमारे सहा लाख ८४ हजार रुपये एवढी आहे. गांजा घेऊन जाणाऱ्या मोटारीसह १५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोहोळजवळ ही कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Sharad Pawar on Vote Jihad: ‘पुण्यात विशिष्ट समाजाचे लोक भाजपाला मतदान करतात’, व्होट जिहादवरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला

हेही वाचा – “बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही” म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…

मोहोळ तालुक्यात कुरुल रस्त्यावर पोलिसांकडून रस्त्यावर नाकेबंदी केली जात असताना एका चार चाकी मोटारीत (एमएच १४ बीए ४५३८) चार सुटकेसमध्ये ८५ गांजाचा साठा सापडला. याप्रकरणी महिलांसह चौघाजणांना अटक करण्यात आली आहे. यशवंत सौदागर जगताप (रा. सोहाळे, ता. मोहोळ), नानोमा बेलारसन बेबर, ज्योत्स्ना सपनकुमार बेबर आणि सपनकुमार बेलारसन बेबर (रा. तांडीगुडा, ता. उदयगीर, जि. गजपती, ओडिसा) अशी त्यांची नावे आहेत.