सोलापूर : ग्राहक म्हणून आलेल्या एका ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरूणीला सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम मिळवून देण्याचे आमीष दाखवून एका हॉटेलात बोलावून घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि विवस्त्र करून चित्रिकरण करून समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यासह रिव्हॉल्व्हर काढून धमकावल्याप्रकरणी एका सराफाला पोलिसांनी अटक केली आहे.

माणिक सुरेश नारायणपेठकर असे आरोपीचे नाव आहे. यातील पीडिता ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरूणी २६ वर्षांची असून ती मूळ आग्रा येथील राहणारी आहे. बंगळुरू येथील एका ऑर्केस्ट्रा बार कलाकार मैत्रिणीच्या सांगण्यावरून गेल्या फेब्रुवारी महिन्यात ती काम मिळविण्यासाठी सोलापुरात आली होती. ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम मिळविण्याच्या प्रयत्नात असताना तिने सराफ बाजारात माणिक नारायणपेठकर याच्या सराफ पेढीमध्ये स्वतःच्या भावासाठी सोन्याची अंगठी खरेदी केली. तेथे तिच्याशी नारायणपेठकर याने ओळख करून घेत तिचा संपर्क क्रमांक घेतला. अनेक ऑर्केस्ट्रा बार मालकांशी आपल्या ओळखी असून त्यांच्या माध्यमातून आपण काम मिळवून देऊ शकतो, असे त्याने आश्वस्थ केले होते.

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

हेही वाचा…नांदेड : कंधारमधील तीन दुकानांना आग

दरम्यान, नारायणपेठकर याने थोड्याच दिवसांनंतर पीडितेशी संपर्क साधून ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम मिळवून देण्याची थाप मारत बार्शी टोल नाक्यावर ऑटोरिक्षातून येण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर नारायणपेठकर याने तिला जवळच्या हॉटेलात नेले. याच हॉटेलात अनेक ऑर्केस्ट्रा बार मालकांची ऊठबैस होते, असे सांगत नारायणपेठकर याने स्वतःची कौटुंबीक व्यथा मांडली. आपली पत्नी बदफैली असल्यामुळे शरीरसुख मिळत नाही, असे सांगितले आणि पीडितेला शरीरसुखाची मागणी केली. परंतु आधीच संशय आल्यामुळे पीडितेने तीव्र विरोध केला असता नारायणपेठकर याने बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिचे विवस्त्र अवस्थेत चित्रिकरण केले आणि समाज माध्यमांत प्रसारित करण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून त्याने पॅन्टीच्या खिशातून रिव्हॉल्व्हर काढून पीडितेच्या दिशेने रोखून पुन्हा धमकावले असे सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. नारायणपेठकर यास अटक केली असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली, तर पीडित तरूणीला महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे