सोलापूर: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याऐवजी उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री म्हणून सोलापूरची जबाबादारी देण्यात आली आहे. दर वर्ष-सहा महिन्यांस पालकमंत्री बदलला जात असल्यामुळे सोलापूरला मागील चार वर्षात पाच पालकमंत्री लाभले आहेत.

हेही वाचा >>> “जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Jitendra Awhad on Ajit Pawar
Jitendra Awhad: “अजित पवार मर्द असतील तर…”, जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अजित पवार गटाचा पलटवार
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
Prime Minister Narendra Modi maharashtra visit
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा; काय आहे या दौऱ्यामागचे राजकारण?
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…

एकेकाळी शरद पवार, राजारामबापू पाटील, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांनी सोलापूरचे पालकमंत्रिपद सांभाळले असताना याच सोलापूरला पालकमंत्री स्थायी स्वरूपात लाभत नसल्याचे दिसून येते. मागील चार वर्षात सुरूवातीला सोलापूरचे पालकमंत्रिपद तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. यात पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड हे पालकमंत्री झाले. नंतर थोड्याच महिन्यात त्यांना बदलून दिलीप वळसे-पाटील हे पालकमंत्री झाले. त्यांचाही काळ औट घटकेचा ठरला. त्यानंतर दत्ता भरणे हे  पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडून नाट्यमय सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे पालकमंत्री झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पुण्याचे पालकमंत्रिपद देताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविण्यात आले आहे. मागी चार वर्षात झालेले सर्व पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याबाहेरील असून अनेकविध विकास प्रश्न प्रलंबित असताना पालकमंत्री क्वचितच सोलापुरात येत असत. सोलापूरपेक्षा स्वतःच्या जिल्ह्यासह मतदारसंघाच्या विकासाकडे रस दाखविणारेच पालकमंत्री होते, असा सोलापूरकरांचा अनुभव आहे. राज्य मंत्रिमंडळात सोलापूरला प्रतिनिधित्व नसल्याची खंतही व्यक्त होत आहे.

Story img Loader