सोलापुरातला गुलाबी मैना नावाच्या पक्ष्यांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. एकत्र उडत असताना आणि सूर्यास्तानंतर घरट्याकडे परतत असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत या पक्ष्यांनी काहीही न करता छान कसरती दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून कुणाचंही मन मोहून जाईल.
भोरडी (अनेकवचन : भोरड्या), मधुसारिका) हा मैनेसारखा हा मुख्यत्वे गुलाबी रंगाचा पक्षी असून याचे डोके, गळा, छाती, पंख, शेपटी काळ्या रंगाची असते. याच्या डोक्याच्या मागील भागावर मानेकडे येणारी शेंडी असते. कोणी या पक्षास ‘गुलाबी मैना’ असेही म्हणतात.
गुलाबी मैनेला पळस मैना असंही नाव
गुलाबी मैनेला पळस मैना असंही म्हटलं जातं. हे स्थलांतरित पक्षी साधारण मध्य आणि पश्चिम आशिया किंवा किंवा मध्य भारतात गुजरात महाराष्ट्र या ठिकाणी हिवाळ्यात आणि हिवाळ्याच्या शेवटी आढळून येतात या पक्ष्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे पक्षी मरमरायझेशन म्हणजे एकत्र उडण्याची पद्धत या प्रक्रियेत अनेक असंख्य पक्षी एकत्र येऊन उडतात आणि त्यांच्या हवाई कसरती दाखवत दाखवतात किंवा एकमेकाला उब देणे किंवा आणि शिकारी पक्षांपासून स्वतःला वाचवणं, ही पक्ष्यांची संख्या एवढी विपुल आणि एवढी प्रचंड प्रमाणात असते की शिकारी पक्षी सुद्धा त्यात शिरकाव करून त्याला शिकार करणे अवघड होते आणि शिकारी पक्षी पण गोंधळून जातो .
मरमरायझेशन का केलं जातं?
मरमरायझेशन अजून एका कारणासाठी केलं जातं ते म्हणजे, पक्ष्यांच्या ऍक्रोबेट म्हणजे हवाई कसरती दाखवणं या पक्षांच्या हवाई कसरती पाहणे खूप विहंगम,विलक्षण आणि दुर्मिळ असे दृश्य असते. या प्रकारचे मरमरायझेशन ग्रासलॅण्डस किंवा माळरानावर हिवाळा किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाहायला मिळते .
(हे चित्रीकरण राहुल उंब्रजकर यांनी सोलापूर येथे कोंडी या ठिकाणी १९ फेब्रुवारी रोजी केले आहे सदर चित्रीकरण हे आयफोन या मोबाईलद्वारे करण्यात आले आहे.)