सोलापूर : सासरी झालेल्या भांडणानंतर माहेरी जाऊन राहिलेल्या पत्नीच्या अंगावर ॲसिड ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी गावात भर दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. भारती हणमंत म्हमाणे (वय २७) असे या ॲसिड हल्ल्यात गंभीर भाजलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने दिलेल्या मृत्युपूर्व जबाबावरून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तिचा पती हणमंत महादेव म्हमाणे (वय ३५, रा. रामपूर, ता. दक्षिण सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा – सांगली : पश्चिम घाटात संततधार सुरूच, महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टीतून १ लाख क्युसेकचा विसर्ग

Bank employee stabbed to death in pune
धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
case registered against two people,young man died due to electric shock in pune
पुणे : फलक लावताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
police arrest five for killing 28 year old man in pimpri chinchwad
बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा जाब विचारणाऱ्या पतीचा खून
nagpur dog bite police marathi news
नागपूर : अटक करायला आलेल्या पोलिसांच्या अंगावर सोडला कुत्रा!
Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी
mumbai, Powai, Man Stabbed in Powai, attempted murder, stabbing, cutter attack,
अवघ्या शंभर रुपयांवरून झालेल्या वादातून गळ्यावर वार, आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

हेही वाचा – सातारा : औषधांच्या नावाखालील बनावट ८७ लाखांची मद्यतस्करी पकडली

जखमी भारती हिचे माहेर हालहळ्ळी (अक्कलकोट) येथील असून तिचा विवाह रामपूर (दक्षिण सोलापूर) येथील हणमंत म्हमाणे याच्याबरोबर झाला होता. परंतु सासरी सतत भांडण होत असल्यामुळे भारती ही सासर सोडून माहेरी येऊन राहात होती. त्याचा राग मनात धरून हणमंत हालहळ्ळी गावी भारती हिच्या माहेरी आला. त्यावेळी घरात भारती एकटीच होती. पती हणमंत यास भारतीने पाणी पिण्यासाठी ग्लास दिला. तेव्हा त्याने भांडण काढत, तू सासरी का येत नाही ? माहेरीच का राहते, असे विचारत सोबत प्लास्टिक बाटलीतून आणलेले ॲसिड भारती हिच्या संपूर्ण अंगावर ओतले. यात ती गंभीर भाजली. तिने आरडाओरड करू लागताच हणमंत हा पसार झाला.