सोलापूर : दोन तालमींच्या भांडणातून स्वतःच्या मुलाच्या झालेल्या खुनाचा सूड उगविण्यासाठी मुलाच्या मारेकऱ्याचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल वयोवृद्ध पैलवानासह सातजणांना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या गाजलेल्या खटल्याकडे सोलापूरकरांचे लक्ष वेधले होते.

पत्रा तालीम आणि पाणीवेस तालीम या दोन तालमीतील भांडणातून पूर्वीच्या खुनाचा सूड उगविण्यात आला होता. यात पत्रा तालीम भागात राहणाऱ्या सत्यवान ऊर्फ आबा कांबळे (वय ३६) याचा ७ जुलै २०१८ रोजी रात्री नव्या पेठेजवळील डाळिंबी आडलगत मोबाईल गल्लीत कोयत्यांनी सपासप वार करून खून झाला होता. या खटल्यात सुरेश अभिमन्यू शिंदे ऊर्फ गामा पैलवान (वय ७४, रा. पाणीवेस तालीम) याच्यासह त्याचे साथीदार गणेश ऊर्फ अभिमन्यू चंद्रशेखर शिंदे (वय ३२, निराळे वस्ती, मुरारजी पेठ, सोलापूर), रविराज दत्तात्रेय शिंदे (वय ३२), प्रशांत ऊर्फ आप्पा पांडुरंग शिंदे (वय ३६, दोघे रा. शाहीर वस्ती, भवानीपेठ, सोलापूर), नीलेश प्रकाश महामुनी (वय ४५, रा. दत्त चौक, सोलापूर), तौसीफ गुडूलाल विजापुरे (वय २७, रा. मेहताबनगर, मुळेगाव रोड, सोलापूर) आणि विनित ऊर्फ ईश्वर भालचंद्र खाणोरे (वय ३१, रा. पुणे) या सात आरोपींना जिल्हा सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी दोषी धरून जन्मठेप आणि इतर कलमांखाली शिक्षेसह प्रत्येकी १७ हजार रुपये दंड ठोठावला.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
cool motherhood for new generation children
इतिश्री : कूल मॉमगिरी
Paithan taluka, june Kaswan village,
एकतर्फी प्रेमातून तिहेरी हत्याकांड; आरोपीला तिहेरी जन्मठेप
Two drown in Pawana Dam after boat capsizes Pune print news
बोट उलटल्याने दोघांचा पवना धरणात बुडून मृत्यू; मृतदेह शोधण्यात यश
Delhi triple murder case update
तक्रारदार मुलगाच निघाला आई-वडील, बहिणीचा खुनी; संपत्तीसाठी २० वर्षीय मुलाचं धक्कादायक कृत्य

हेही वाचा – सांगली : प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांना शुभेच्छा

पत्रा तालीम आणि पाणीवेस तालमीत २००४ साली शिवजयंती मिरवणुकीत धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्यातूनच पाणीवेशीतील सुरेश ऊर्फ गामा पैलवान याचा मुलगा ऋतुराज याचा खून झाला होता. त्या खटल्यात पत्रा तालमीच्या सत्यवान ऊर्फ आबा कांबळे याच्यासह दहाजणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. परंतु २०१४ साली मुंबई उच्च न्यायालयात अपिलामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यामुळे गामा पैलवान व त्याचै साथीदार चिडले होते. मृत आबा कांबळे हा डाळिंबी आडजवळ मोबाईल गल्लीत मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय करीत होता. ७ जुलै २०१८ रोजी तुरळक पाऊस पडत असताना आबा कांबळे हा दुकानाजवळ आडोशाला थांबला असताना दुचाकी गाड्या उडवत आलेल्या आरोपींनी आबा कांबळे याच्यावर कोयत्यांनी हल्ला केला. तेव्हा जीव वाचविण्यासाठी तो पळत असताना पाठलाग करून त्याच्यावर सपासप ५६ वार करण्यात आले.

हेही वाचा – महाराष्ट्रात दुष्काळात चारा पाठविला म्हणून ‘अमूल’वर मोदींनी भरला होता खटला, शरद पवार यांचा आरोप

ही सर्व थरारक घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली होती. मृत कांबळे याचे रक्ताने माखलेले कपडे, गुन्ह्यात वापरलेल्या कोयत्यावरील रक्ताचे डाग तपासले असता ते मिळतेजुळते निघाले. सीसीटीव्ही फुटेजचा अस्सलपणा पुढे आला. या खटल्यात २८ साक्षीदार तपासले गेले. यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय जगताप, तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त डॉ. दीपाली काळे, फिर्यादी शुभम धुळराव तसेच वैद्यकीय आणि रासायनिक पृथःकरणाशी संबंधित तज्ज्ञ अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत तर आरोपींतर्फे ॲड. श्रीकांत जाधव, ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. झुरळे यांनी काम पाहिले.

Story img Loader