सोलापूर : सोलापूर महापालिकेने बेकायदेशीर ठरविलेली श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी गुरूवारी दुपारी जमीनदोस्त झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात या चिमणीचे पाडकाम करण्यात आले. या कारवाईमुळे कारखान्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून यात सुमारे २७ हजार सभासद शेतक-यांसह कामगारांची रोजीरोटी धोक्यात आली आहे.

सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरली म्हणून २४० कोटी रूपये खर्चाच्या ३८ मेगावाट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची ९२ मीटर उंच चिमणी पाडून टाकण्याची मागणी पुढे आली होती. तर महापालिकेनेही या चिमणीचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून कारवाई हाती घेतली होती. या चिमणीच्या आडून राजकारण खेळण्यात आले आहे. चिमणी वाचविण्यासाठी शेवटपर्यंत झालेले प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांच्यासह सर्व सभासद शेतकरी आणि कामगार हतबल झाले. चिमणी पाडण्यासाठी महापालिकेने सिध्देश्वर साखर कारखान्याला ४५ दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावली होती. यापूर्वीचा अनुभव पाहता पाडकामाची नोटीस बजावली तरी प्रत्यक्षात चिमणी पाडण्याची कारवाई होणार का, याबाबत शंका-कुशंका व्यक्त होती.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar, sugar factory, Amit Shah allegation,
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
union home minister amit shah slams sharad pawar
‘पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील १०० साखर कारखाने मृत्युपंथाला’, अमित शहा यांचा हल्लाबोल
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
National Sugar Factory Federation made various demands to the Central government
साखर उद्योग आर्थिक संकटात ? राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्राकडे केल्या विविध मागण्या
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

हेही वाचा >>> ‘चिमणी’चे राजकारण भाजपसाठी तापदायक ठरणार?

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या २६ मे रोजी सोलापूर भेटीत, विमानसेवेसाठी असलेला सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा लवकरच दूर होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अखेर बंगळुरूच्या एका कंपनीला चिमणी पाडण्याचे कंत्राट दिले. त्याप्रमाणे प्रत्यक्ष चिमणी पाडण्याचे ठरले. त्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी सिध्देश्वर कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात संचारबंदीचा आदेश लागू केला आणि सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला. कारखानाही ताब्यात घेण्यात आला. या कारवाईला कारखान्याच्या शेतकरी सभासदांसह कामगारांनी विरोध केला असता त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. माकपच्या तीनशे कार्यकर्त्यांनी चिमणी पाडकामाच्या विरोधात  गनिमीकाव्याने कारखानास्थळाकडे येण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तो अयशस्वी ठरविला. शेवटी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने चिमणी पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली. गुरूवारी दुपारी अवघ्या काही क्षणांत उंच चिमणी जमीनदोस्त झाली. तेव्हा प्रशासनाने समाधानाचा सुस्कारा सोडला.

चिमणी पाडल्यानंतर धर्मराज काडादी यांनी भावूक होत आपली हतबलता बोलून दाखविली. आपण कोणाचे वाईट केले नाही. कोणत्याही राजकीय पक्षात नाही. फक्त कारखान्याच्या माध्यमातून हजारो सभासद शेतकरी आणि कामगारांसाठी काम केले. तरीही काहीजणांनी जाणीवपूर्वक त्रास दिला. मला दिलेला त्रास बाजूला ठेवा, पण किमान सभासद शेतकरी आणि कामगारांच्या संसाराचा तरी विचार करायला हवा होता. शेतकरी व कामगारांची रोजीरोटी हिरावून केलेली कारवाई निश्चितच महागात  पडेल, असा सूचक इशारा काडादी यांनी दिला आहे. दरम्यान, चिमणी पाडल्यामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतक-यांनी उद्विग्न होऊन आपल्या शेतातील उभा ऊस जाळून टाकत आहेत. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात असे प्रकार घडले आहेत.