सोलापूर : सोलापूर शहर उत्तर मतदार संघात भाजपकडून पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम यंत्रावरील मतदानाची फेरपडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ९४ हजार ४०० रुपयांचे शुल्क त्यांनी भरले आहे. कोठे यांनी फेरपडताळणीसाठी कायदेशीर देय असलेले ९४ हजार ४०० रुपयांचे चलन प्रशासनाकडे भरले आहे. एका ईव्हीएम यंत्रामागे ४० हजार रुपये अधिक १८ टक्के जीएसटी याप्रमाणे कोठे यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात संपूर्ण चलन भरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : सोलापूर : मतिमंद, दिव्यांग महिलेवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

कोठे यांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या अर्जावर ४५ दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे. १४ दिवसांचा कालावधी हा निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी अपील कालावधी मानला जातो. या कालावधीत अपील दाखल केल्यानंतर पुढे न्यायालयाच्या आदेशानुसार ईव्हीएम यंत्राची पडताळणी होणार आहे. निवडणुकीची याचिका दाखल न झाल्यास ४५ दिवसांत ईव्हीएम उत्पादक कंपनीच्या संबंधित तज्ज्ञ अभियंत्याला पाचारण करून त्याच्यामार्फत ईव्हीएम यंत्राचे माॅकपोल केले जाते. मतदारांनी ईव्हीएम यंत्रावर टाकलेले मतदान महेश कोठे यांनाच मिळाले आहे काय, याची खातरजमा करून दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे विजयकुमार देशमुख यांना एक लाख १७ हजार २१५ मते मिळाली, तर पराभूत महेश कोठे यांच्या पारड्यात ६२ हजार ६३२ मते पडली आहेत.