सोलापूर : पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांना प्रदेश पक्षश्रेष्ठींनी पक्षशिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. या नोटिसीवर सात दिवसात उत्तर देण्यास त्यांना कळविण्यात आले आहे.

भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने पाठविण्यात आलेल्या या नोटिशीमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी विविध आठ आक्षेप ठेवण्यात आले आहेत. माढा लोकसभा निवडणुकीत माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेस अनुपस्थित राहणे, माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपविरोधात काम करणे, एका पत्रकार परिषदेत मोहिते-पाटील कुटुंबीयांनी माढा व सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा पाडण्याचे वक्तव्य करणे, लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या बूथप्रमुखांना आपल्या कार्यकर्त्यांकडून धमकावणे, पोलिंग एजंट मिळून देणे, माढा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांची गळाभेट घेऊन मतदारांना भाजपच्या विरोधात मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे, महायुती सरकारने ज्या शंकर सहकारी साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर येण्यासाठी आर्थिक साह्य उपलब्ध करून दिले, त्या साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकरवी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा प्रचार करणे आदी आक्षेपार्ह मुद्द्यांचा नोटिशीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
archana patil chakurkar marathi news
अर्चना चाकुरकरांच्या प्रश्नामुळे भाजपमधील जुन्या – नव्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
Mahavikas Aghadi Shiv Sena MP Supriya Sule
महाविकास आघाडीतील शिवसेना खासदार सुप्रिया सुळेंवर नाराज
BJP boycotts visit of Buldhana Guardian Minister and Rehabilitation Minister Makarand Patil
बुलढाणा : पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार! युतीत विसंवाद
congress mla vijay wadettiwar accused election commission of Acting on BJP s warnings
निवडणूक आयोग मनुवादी, भाजपच्या इशाऱ्यावर चालतो… वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे…
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
Girish Mahajan gets Nashik Guardian Minister post print politics news
गिरीश महाजन यांच्यासाठी कुंभमेळा आला धावून

हेही वाचा – “ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली…”, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; अजित पवार व पक्षावरील नाराजी व्यक्त करत म्हणाले…

u

या पार्श्वभूमीवर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपमधून बडतर्फ करण्याची मागणी माजी आमदार राम सातपुते व इतरांनी केली होती. त्यानुसार अखेर प्रदेश पक्षश्रेष्ठींनी मोहिते-पाटील यांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे काय उत्तर देणार, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Portfolio Distribution : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार तर झाला, खातेवाटप कधी? मंत्री उदय सामंतांनी सांगितली वेळ

भाजपबरोबरील संबंध बिघडले

पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी मागील २०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपची ताकद वाढली होती. त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आणि नंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राम सातपुते हे निवडून येण्यास मदत झाली होती. त्याचवेळी भाजपने रणजितसिंह मोहिते-पाटील यांना हे २०२० मध्ये विधान परिषदेवर निवडून आणले होते. शिवाय त्यांच्याच अधिपत्याखालील सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी महायुती सरकारने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली होती. परंतु नंतर गेल्या तीन वर्षात माढ्याचे तत्कालीन खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्याशी बिनसल्यानंतर आणि त्याची भाजप पक्षश्रेष्ठींनीही दखल न घेतल्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबीय भाजपापासून दुरावत गेले.

Story img Loader