सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून रक्कम वसुलीच्या नोटिसा बँकेच्या तत्कालीन ३२ संचालकांसह तीन अधिकाऱ्यांना बजावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी भाजपने ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना लक्ष्य बनविले आहे. त्याचाच भाग म्हणून रणजितसिंह मोहिते-पाटील हे अध्यक्ष असलेल्या सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद का रद्द करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस प्रादेशिक सहसंचालक (साखर) प्रकाश अष्टेकर यांनी बजावली आहे.

या नोटिशीवर येत्या ६ जानेवारी रोजी स्वतः उपस्थित राहून लेखी अथवा तोंडी म्हणणे सादर करण्याच्या सूचना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना देण्यात आल्या आहेत. यावरून सत्ताधारी भाजपने मोहिते पाटील कुटुंबीयाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येते.

Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Shiv Sena Legislature Party leader Aditya Thackeray congratulates Chief Minister Devendra Fadnavis print politics news
एकनाथ शिंदे यांचा नेहमीसारखा विलंब…अजित पवार यांची कोपरखळी
What devendra Fadnavis says to eknath shinde
CM Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी कसे तयार झाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Manoj Jarange Patil
Manoj Jarange : जरांगे विरूद्ध फडणवीस संघर्ष पुन्हा पेटणार? शपथविधी होताच पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम, म्हणाले…

हेही वाचा : Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित केलेल्या तत्कालीन ३२ संचालकांसह इतर तीन अधिकाऱ्यांना २३८ कोटी ४३ लाख रुपयांच्या व्याज व दंडासह वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यातून कर्जाची मुद्दल, व्याज आणि दंड मिळून सुमारे ११०३ कोटींपर्यंत वसुली होऊ शकते. यात विजयसिंह मोहिते- पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल, मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजय शिंदे, एसटी महामंडळाचे दिवंगत माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक त्यांचे वारसदार, माजी आमदार दीपक साळुंखे ही नेते मंडळी अडकली आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात केलेला प्रवेश, परिणामी माढा लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत पक्षाचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते-पाटील हे पक्षाच्या प्रचारापासून अलिप्त राहिले होते. याबाबतही नुकतीच पक्षाकडूनही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षशिस्तीबद्दलच्या कारवाईनंतर लगोलग आता शंकर कारखान्याच्या संचालकपदाबाबतही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Sanjay Raut House : संजय राऊत यांच्या घराच्या रेकी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून मोठी माहिती, “यामध्ये आढळलेले चार इसम…”

सदाशिवनगरचा शंकर सहकारी साखर कारखाना तीन वर्षे बंद होता. सध्या तो आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे आहे. त्यांचे भाजपशी असलेल्या सलोख्याच्या काळात हा कारखाना अवसायानात निघालेला असताना तत्कालीन महायुती शासनाने कारखान्याला आर्थिक साह्य दिले होते. परंतु आता बदलत्या राजकीय परिस्थितीत या कारखान्याची थकहमी काढून घेण्याच्याही हालचाली सुरू झाल्याचे कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्वतः विधिमंडळ अधिवेशनात बोलताना माळशिरस तालुक्यातील गुंडगिरीविषयी सूतोवाच करताना मोहिते-पाटील कुटुंबीयाविषयीचा राग प्रकट केला आहे.

Story img Loader