एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता
सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेसाठी अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी पाडून टाकण्याचा वाद टोकाला गेला आहे. एकीकडे ही चिमणी वाचविण्यासाठी सिद्धेश्वर कारखान्याने कसोशीने प्रयत्न सुरू केले असताना दुसरीकडे प्रशासनाने चिमणी पाडून टाकण्यासाठी सज्जता ठेवली आहे. त्यामुळे ९० मीटर उंच चिमणीचे भवितव्य सध्या तरी अधांतरी राहिले आहे.
शहरातील होटगी रस्त्यावर अवघ्या ३५० एकर क्षेत्रात विमानतळ अस्तित्वात आहे. त्यालगतच सिद्धेश्वर साखर कारखाना सुमारे ५० वर्षांपासून कार्यरत आहे. भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार विमानतळाच्या सभोवताली अलीकडे नजीकच्या लिंबी चिंचोळी येथील ‘पावरग्रीड’मधून पसरलेल्या उच्चदाबाच्या वीज तारा आणि वीज वहन करणाऱ्या उंच मनो-यांच्या रांगा, अन्य औद्य्ोगिक प्रकल्पांच्या चिमण्या, बहुमजली इमारती आदी सुमारे २५ अडथळे आहेत. परंतु केवळ एकमेव ‘सिद्धेश्वर’च्या चिमणीमुळेच विमानसेवा सुरू होऊ शकत नाही, हा चिमणीचा अडसर दूर करावा म्हणून काही मंडळींनी वातावरण पेटविले आहे. खरे तर साप म्हणून भुई धोपटण्याचा हा प्रकार म्हटला पाहिजे.
आतापर्यंत केवळ ‘सिद्धेश्वर’ची चिमणी पाडण्यात रस दाखविणा-या महापालिका प्रशासनानेही आता अन्य अडथळेही दूर करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. सोलापूर महापालिका प्रशासनाने ‘सिद्धेश्वर’ची चिमणी यापूर्वीच बेकायदेशीर ठरविली असून त्यावर न्यायालयीन लढाईही झाली आहे. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवून सिद्धेश्वर कारखान्याला सध्या सुरू असलेला गळीत हंगाम आटोपता घेण्याचा आदेश दिला आहे. एवढेच नव्हे तर ‘सिद्धेश्वर’चा वीज आणि पाणीपुरवठाही खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार दिवसांनतर नोटिशीची मुदत संपताच ही कारवाई केली जाणार आहे.
दुसरीकडे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूनेही ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी, कारखान्यावर उपजीविका अवलंबून असलेले अन्य घटक तसेच सामाजिक संघटनांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील वातावरण कलुषित होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषत: ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेसह आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच या घडामोडी घडत असल्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाला अधिक सजग व्हावे लागणार आहे.
दिवंगत नेते, माजी खासदार मडय़प्पा बंडप्पा तथा अप्पासाहेब काडादी यांनी १९६९ साली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली होती. स्थानिक बहुसंख्य वीरशैव लिंगायत समाजाच्या मानबिंदू समजल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर साखर कारखान्यासह सिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वर शिक्षण संस्था, सिद्धेश्वर कर्करोग रूग्णालय तथा संशोधन संस्था, संगमेश्वर शिक्षण संस्था आदी अनेक प्रबळ संस्था सुरुवातीपासून जन्मजात श्रीमंत अशा काडादी घराण्याशी निगडीत आहेत. विश्वास, पारदर्शकता, काटकसरीचा कारभार यामुळे काडादी घराणे आणि त्यांच्या ताब्यातील संस्था यांचे अतूट नाते वर्षांनुवर्षे टिकून आहे.
पुढील महिन्यात ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा भरणार आहे. करोना संकट निवळत चालल्यामुळे गेल्या महिन्यात पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेसाठी शासनाने निर्बंध शिथील केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातील प्रमुख पाच यात्रांपैकी मानल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर यात्राही खुल्या वातावरणात साजरी करण्याची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने सिद्धेश्वर मंदिर समितीसह प्रशासनाने पूर्वतयारी हाती घेतली आहे. याशिवाय आगामी महापालिका निवडणूकही तोंडावर आली आहे. एवढेच नव्हे तर खुद्द सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रRियाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद पेटला
आहे.
विमानसेवेशी संबंधित उल्लेखनीय बाब अशी की, सध्याचे जुने विमानतळ आकाराने खूपच लहान असल्यामुळे भविष्यकाळाचा विचार करता तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शहरानजीक बोरामणी येथे नवीन आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ उभारण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले होते. त्यासाठी शासनाने आवश्यक असलेली सुमारे दोन हजार एकर जमिनीचे यापूर्वीच संपादनही केले आहे. दोन हजार एकर क्षेत्रातील बोरामणीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले गेल्यास सोलापूरकरांची भविष्याची सोय होईल. त्या तुलनेत सध्याचे अवघ्या ३५० एकर क्षेत्रातील विमानतळ प्रत्यक्षात आज-उद्या सुरू झाले तरी त्याचे भवितव्य काय ? हे जुने विमानतळ पुढील काळात आकारमानाने छोटेच पडणार आहे. शासनाकडून गरजेनुसार भरीव निधी उपलब्ध होत नसल्यामुळे बोरामणी विमानतळ म्हणजे मृगजळ ठरू पाहात आहे.