सोलापूर : एका जेसीबी चालक तरुणाने प्रेमभंग झाल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन इन्स्टाग्रामवर स्वतःच्या छायाचित्राला फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली आणि स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सांगोला तालुक्यातील कटफळ येथे उजेडात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – काँग्रेसच्या माजी आमदाराची शेतजमीन भाऊ, पुतण्याने लाटली; सोलापुरात गुन्हा

हेही वाचा – MVA Agitation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन; जयंत पाटील म्हणाले,”षडयंत्र…”

u

संजय भगवान केदार (वय २५, रा. लातूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो गार्डी येथील एका उद्योजकाकडे जेसीबी मशीनवर चालक म्हणून नोकरीस होता. त्याने आपल्या मोबाईलवरून जेसीबीमालक फाटे यांच्याशी संपर्क साधून, आपला प्रेमभंग झाल्याचे कळविले. माझे एका मुलीवर प्रेम आहे. ती मला लग्नास नकार देत असल्यामुळे माझी जगण्याची इच्छा उरली नाही, असे सांगून केदारने मोबाईल बंद केला. नंतर त्याने त्याचे लोकेशन पाठवले. तेव्हा फाटे व त्यांचे काही मित्र त्याचा शोध घेत त्याने पाठविलेल्या लोकेशनवर गेले असता तो कटफळ येथील वनक्षेत्रात पाझर तलावाजवळ एका पळसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी गळफास सोडून त्यास तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. सांगोला पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.