सोलापूर : कोकणात मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारताना तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असल्याची शक्यता प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी व्यक्त केली आहे. या पुतळ्याची उभारणी करताना स्थापत्यरचनेच्या नियमांचे पालन झाले होते, की नाही याची चौकशी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.

रामपुरे म्हणाले, की जेव्हा एखाद्या पुतळ्याची उंची १५ फुटांपेक्षा जास्त असते, तेव्हा शिल्पकारासोबत तज्ज्ञ अभियंत्याचे कामही जास्त महत्त्वाचे असते. पुतळ्याचे लोखंडी रॉड उत्तम दर्जाचे असावेत. त्याची उंची जितकी जास्त तितका जमिनीखालचा पाया भक्कम असावा लागतो. कोणताही उंच पुतळा उभारताना तेथील जमिनीची प्रत शास्त्रीय दृष्टिकोनातून तपासली जाते. विशेषतः भूकंप झाला तर त्याचा परिणाम पुतळ्यावर होऊ नये, याचा विचार केला जातो. भूगर्भामध्ये कठीण खडक किती, पाणी किती, हे तज्ज्ञांकडून प्रमाणित केल्यावरच काम सुरू केले जाते.

Harshwardhan Patil Meets Sharad Pawar
Harshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील विधानसभेला तुतारी हाती घेणार? शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
minister dharmarao baba atram marathi news
मंत्र्यांच्या बंगल्यावर तिऱ्हाईताकडून खातेबैठका
Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…
case against sculptor and consultant marathi news
शिल्पकार, सल्लागारावर गुन्हे; मालवण पुतळा दुर्घटनाप्रकरणी सदोष मनुष्यवधाचाही ठपका
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed in Malvan
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया, दुर्घटनेचं कारण काय?

हेही वाचा – सांगली : कोयना, चांदोली धरणातील विसर्गात वाढ; पाणलोट क्षेत्रात संततधार, कृष्णा, वारणा नद्यांना पूर

भगवान रामपुरे यांनी अलीकडे शंकराचार्यांचा १०८ फूट उंच पुतळा उभारला आहे. त्याचा अनुभव कथन करताना ते म्हणाले, की शंकराचार्यांच्या पुतळ्याची उभारणी करण्याचे काम आम्हाला एल अँड टी कंपनीसोबत मिळाले होते. या पुतळ्यासाठी ८० फूट खोल पाया खणला होता. पुतळा उभारताना पुढील पाचशे वर्षे काही होणार नाही, अशी हमी मागण्यात आली होती. संबंधित तज्ज्ञांकडून सातशे वर्षे काही होणार नाही, यांची हमी देणारे प्रमाणपत्र दिल्यानंतर शंकराचार्यांच्या पुतळ्याचे काम करण्यात आले, असा अनुभव रामपुरे यांनी सांगितला.

राजकोट किल्ल्यावरील पुतळा ताशी ४५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे कोसळल्याचा दावा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यावर रामपुरे म्हणाले, की जर एवढ्या वेगाने वारे वाहत असतील, तर त्याचा विचार आधीच व्हायला पाहिजे होता. यात केवळ शिल्पकाराची चूक नाही. अशा प्रकारे कोसळणे ही आमच्यासाठी कलावंत म्हणून मान खाली घालायला लावणारी घटना असते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – सांगली : येरळा नदीच्या पुरात वृद्ध दाम्पत्य बेपत्ता

गुणवत्तेपेक्षा निविदेला महत्त्व

शासकीय कामे करताना निविदा मागविल्या जातात. जी निविदा कमी दराची असते, ती निविदा मंजूर करून कंत्राटदाराला काम दिले जाते. यात कामाचा दर्जा, गुणवत्ता विचारात न घेता केवळ निविदेची रक्कम किती कमी, हे पाहिले जाते. यात पुन्हा कामाची देयके अदा करताना लाचखोरीचे प्रकार घडतात. याबाबतचा पूर्वानुभव विचारात घेता आपण स्थानिक स्वराज्य संस्थांकडील कामे घेणे बंद केल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्याबाबतच्या वाईट अनुभवाचे उदाहरण देताना रामपुरे म्हणाले, की २००३ मध्ये सोलापुरात आपण झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा बनविला होता. घोड्याच्या मागील दोन पायांवर असलेला हा पुतळा अजूनही मजबूतपणे उभा आहे. परंतु कामाची देयके मंजूर करून रक्कम मिळण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो.