सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागत असताना त्या पाठोपाठ तापमानाचा पाराही चाळिशी पार करून पुढे गेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच शनिवारी ४०.२ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.
मागील फेब्रुवारीअखेरपासून सोलापूरचे तापमान वाढायला सुरूवात झाली होती. चालू मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात आठवडाभर तापमान ३७ अंशांच्या पुढे होते. तत्पूर्वी, रात्री हिवाळा आणि दिवसा उकाडा जाणवत होता.
हेही वाचा..सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा पोटनिवडणूक नाही
गेल्या आठवड्यापासून मात्र सकाळपासून उन्हाचे चटके बसत असताना तापमान ३९.१ अंश सेल्सियस ओलांडत चाळिशीच्या दिशेने सरकत होता. अखेर शनिवारी तापमानाचा पारा ४०.२ अंशांवर थांबला. या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवत आहे. सकाळी नऊपासून उन्हाचे चटके बसत असल्यामुळे दुपारी नागरिक उन्हात फिरणे टाळत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी परिधान करणे पसंत केले जात असून थंड ताक, लस्सी, लिंबू सरबत, आईस्क्रिमसह फलाहाराचा आधार घेतला जात आहे.