सोलापूर : यंदाच्या उन्हाळ्यात सोलापूरच्या तापमानाचा पारा सर्वोच्च ४३.७ अंश सेल्सियसवर पोहोचला असून सर्वत्र उष्णतेची लाट जाणवत असतानाच सोलापूर आणि माढा दोन्ही लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या दुपारच्या सभांना गर्दी होण्यासाठी संबंधित राजकीय पक्षांची कसोटी लागत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोलापुरात चार-पाच दिवसांपासून तापमानात पुन्हा असह्य वाढ होऊन रविवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान ४३.७ अंशांवर पोहोचले. चालू एप्रिल महिन्यात ५ तारखेला या हंगामातील ४३.१ अंश इतके सर्वाधिक तापमान मोजले गेले होते. काल शनिवारी तापमान ४२ अंशांवर होते. त्यानंतर रविवारी तापमानाचा पारा आणखी वाढून ४३.७ अंशांवर गेल्यामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे. रात्रीसुध्दा हवा खेळत नाही. उष्म्याची धग जाणवत असल्याने रात्री घराच्या गच्चीवर उघड्यावर झोपले तरी उष्म्यापासून दिलासा मिळत नाही. वृध्द आणि लहान मुलांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे.
हेही वाचा…नाशिकच्या उमेदवारीबाबत केलेल्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “ते विधान मी…”
अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडात आहेत. प्रचारासाठी सभा,बैठका, मेळाव्यांसह मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या २४ एप्रिल रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा लक्ष्मी मिलच्या मैदानावर दुपारच्या रणरणत्या उन्हात झाली होती. त्यावेळी सुमारे ५० हजारांचा जनसमुदाय उन्हाचे चटके सहन करीत राहुल गांधी यांचे भाषण ऐकत होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांच्या सभा दुपारच्या तळपत्या उन्हात झाल्या आहेत. मात्र आता प्रचार शिगेला पोहोचला असताना तापमानाचा पारा आणखी वाढल्यामुळे नेत्यांच्या दुपारच्या सभांसाठी गर्दी होणे जिकिरीचे झाले आहे.
हेही वाचा…“मोदी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहून…”; शरद पवार यांचा हल्लाबोल
उद्या सोमवारी दुपारी पंतप्रधान मोदी यांची सभा होम मैदानावर होणार आहे. त्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दोन लाख जनसमुदाय उपस्थित राहण्याकरिता नियोजन केले आहे. त्यासाठी मतदारसंघातील महायुतीच्या सर्व पाच आमदारांसह इतर प्रमुख नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविली आहे. परंतु दुपारच्या उन्हाच्या असह्य तडाख्यात मोदी यांच्या सभेला अपेक्षित गर्दी होणार का, याबद्दल उत्सुकता आहे. सभास्थळी सावलीसाठी शामियाना उभारण्यात आला आहे. परंतु तो अपेक्षित जनसमुदायासाठी पुरेल एवढा नाही. मोदी यांच्या सभेनंतर दुपारी उशिरा शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त जाहीर सभा कर्णिक नगर मैदानावर होणार आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यांचीही सभा दुपारीच होणार आहे.