सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांना जाहीर झाला आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या १९ व्या वर्धापनदिनी न्या. लळीत यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी एका पत्रकार परिषदेत केली. सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी न्या. लळीत हे ठरले आहेत. येत्या १ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी सकाळी नऊ वाजता हुतात्मा स्मृतिमंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास मुंबई विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

rising mortality rates in young adults post-corona in america
करोनानंतर अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूदरात वाढ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Economist Politics Delhi Elections Prime Minister
‘रेवडी’चे राजकीय वजन संपले ?
Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
first generation of immigrants is mirror of social changes taking place in India
समृद्ध अडगळीचे ओझे…
Actor Ashok Saraf conferred with Padma Shri
Ashok Saraf : अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, विनोदाच्या अनभिषिक्त सम्राटाचा सन्मान

हेही वाचा – ‘कसब्या’चा धडा घेऊन भाजप शहराध्यक्षांची निवड

अन्य पुरस्कार : १) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार – एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर २) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार – प्राचार्य डॉ. शंकर नवले, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर, प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ, श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर

हेही वाचा – छप्पर उडत असलेल्या ST बसचा व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा राज्य सरकारला टोला; म्हणाले, “फक्त जाहिरातबाजी…”

३) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ) – डॉ. रवींद्र चिंचोलकर, सामाजिकशास्त्रे संकुल, डॉ. राजीवकुमार मेंते, संगणकशास्त्र संकुल. ४) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय) – प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर, प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर, ५) उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार – डॉ. अभिजीत जगताप, वैद्यकीय अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. उमराव मेटकरी, उपकुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

Story img Loader