मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर २ या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला. ठाण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा पहिला भाग तुफान गाजला. अनेक आठवडे हा चित्रपट विविध थिएटरमध्ये हाऊसफुल होता. तसंच, महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाने तुफान गल्ला जमावला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. या दुसऱ्या भागाचे ९ डिसेंबरपासून चित्रिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आज ठाण्यात मुहूर्त संपन्न झाला. यावेळी या चित्रपटाचं कौतुक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अगोदरच्या सिनेमाला (धर्मवारी भाग १) १७ ते १८ पारितोषिके मिळाली. प्रसाद ओकला अभिनयाची वेगळी पारितोषिके मिळाली. प्रसादला मानलं पाहिजे. प्रवीणने त्याला बरोबर शोधलं. प्रसादचा दिघेसाहेबांशी कधी संपर्क नव्हता, कधी पाहिलंही नव्हतं. तो अंधारात एकदा समोरून आला, तेव्हा दिघे साहेब आलेत असाच भास झाला. एवढं मन लावून काम केलं त्याने. कोणताही अभिनय करताना जीव ओतून टाकावा लागतो. सर्वस्व अर्पण करावं लागतं. तेव्हा ती भूमिका पूर्ण होते. सिनेमे येतात जातात, पण अभिनय करायचा म्हणून करायचा नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> “सरकार पडणार सांगणारे ज्योतिष थकले, अन् आता…”, एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर पलटवार; म्हणाले “दिघे साहेब…”

“धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन आले. मराठी सिनेमा गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये बघितला गेला. हा चित्रपट हिंदीत बनवा असंही काही म्हणाले. त्यामुळे भाग २ हिंदीतही आला पाहिजे. भाग १ चांगला झाला. सगळ्यांनी मेहनत घेतली, त्यासाठी सगळ्यांचे आभार, असं म्हणत काही लोकांना सिनेमा खटकला”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

ते म्हणाले की, “काही लोकांना सिनेमा खटकला. काही लोक सिनेमा बघता बघता उठून गेले. काही लोकांना काही सीन आवडले नाहीत. पण, आता कोणालाही आवडो ना आवडो फूल फायनल ऑथोरेटी आपण आहोत. तेव्हा थोडं घुसमट, इच्छेविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागल्या. प्रविणलाही आवडल्या नव्हत्या त्या गोष्टी. कलाकार लोक सर्किट असतात, सर्किट म्हणजे मुडी असतात. त्यांना गोड बोलून प्रेमाने सांगावं लागतं. काही लोकांना अजिर्ण झालंय. पण त्यावर एक वर्षांपूर्वीच गोळी दिलीय”, अशीही मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

“आपण दिघेसाहेबांच्या तालमीत शिकलो आहोत त्यामुळे गोळी कधी द्यायची, छोटी द्यायची की मोठी द्यायची हे कळतं. कधी इंजेक्शन द्यावं लागतं. कधी ऑपरेशनही करावं लागतं. मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशनही करून टाकलं”, असंही ते पुढे म्हणाले.

“आनंद दिघेंचं कोणत्याही बँकेत खातं नव्हतं. पण एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला होता की आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे. यांच्या या प्रश्नावर मला आश्चर्यही वाटलं होतं”, असाही पुनरुच्चार त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some people are watching movies chief ministers big statement about dharmaveer movie said now whether one likes it or not sgk
Show comments