Somnath Suryavanshi Mother Reaction : परभणी जिल्ह्यात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. मात्र, हे आरोप सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने फेटाळून लावले आहेत. तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली १० लाखांची मदतही त्यांनी नाकारली आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

या घटनेत पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यांच्याबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “सोमनाथ सुर्यवंशी हे कायद्याचं शिक्षण घेत होते. त्यांना जाळपोळीच्या घटनेत अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना कोठडीत मारहाण झालेली नाही. त्यांना श्वसनाचा आजार होता असं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १० लाखांची मदत देण्यात येणार आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई काय म्हणाल्या?

“मुख्यमंत्र्यांचं बोलणं मला मान्य नाही. माझ्या मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतला. यावर मला न्याय पाहिजे. मंत्र्यांच्या आश्वासनांवर माझा विश्वास नाहीय. मला १० लाख रुपये नको. ते १० लाख रुपये मंत्र्यांच्या खिशातच ठेवा. नाहीतर कोणत्या तरी पोलिसाला खाऊ घाला. नाश्ता करायला द्या. खाऊपिऊन मारायला ताकद येते. मला माझा मुलगा पाहिजे”, असा खेद त्यांच्या आई वत्सला सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >> Devendra Fadnavis : परभणीच्या घटनेत काय घडलं? आरोपी मनोरुग्ण होता का? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला मदत जाहीर

त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या मुलाला कसलाच आजार नव्हता. तो एक नंबर होता. कसलं इंजेक्शन नाही की गोळी नाही. कसलेच उपचार त्याच्यावर सुरू नव्हते.”

नाहीतर मी इथेच जीव देईन

“पोलीस अधिकाऱ्याला निलंबित न करता त्याला जन्मठेप द्या. १० ते १५ तारखेपर्यंत ज्यांनी माझ्या मुलाचा बळी घेतलाय त्या प्रत्येकाला जन्मठेप द्या. मला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर मी इथेच जीव देईन”, असा आक्रमक पवित्राही त्यांनी घेतला.

“गरिबांवर अन्याय झाला आहे. आम्ही इथून गरिबांची मुले शिक्षण शिकायचं की गुन्हेगार्चाय मार्गावर जावं हे फडणवीसांनी सांगावं. माझ्या भावाची हत्या केलीय, तर हा अन्याय पुढे असाच सुरू राहणार. त्यामुळे प्रत्येक गरीब घरातील मुलं गुन्हेगारच बनतील. फडणवीसांनी चुकीची बाजू न घेता आम्हाला न्याय द्यावा. फडणवीसांनी विचार केला पाहिजे की याजागी त्यांचं कुटुंब असतं तर त्यांनी असा निर्णय घेतला असता का?” अशी प्रतिक्रिया सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाने दिली.

Story img Loader